तब्बल 10 वर्षांनी पाकिस्तान घरच्या मैदानावर खेळणार कसोटी, 'या' संघानं पुन्हा घेतली रिस्क

तब्बल 10 वर्षांनी पाकिस्तान घरच्या मैदानावर खेळणार कसोटी, 'या' संघानं पुन्हा घेतली रिस्क

2009मध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व संघांनी पाकिस्तानमध्ये खेळण्यास मनाई केली होती.

  • Share this:

कराची, 19 जुलै : पाकिस्तान देशाप्रमाणेच सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची परिस्थीती आहे. 2009मध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व संघांनी पाकिस्तानमध्ये खेळण्यास मनाई केली होती. यात हल्ल्यात श्रीलंकेचा संघ थोडक्यात बचावला होता, दोन खेळाडू जखमीही झाले होते. मात्र पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यामुळं तब्बल 10 वर्षांनी पाकचा संघ घरच्या मैदानावर कसोटी सामना खेळणार आहे.

पीसीबीनं श्रीलंकेच्या संघाला पाकिस्तानमध्ये पाठवण्याआधी सुरक्षा संघाचा पाठवण्याची विनंती केली होती. त्यानंतर श्रीलंकन बोर्डनं पाकसोबत सामना खेळण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच श्रीलंकेचा संघ पाकमध्ये जात आहे, असे नाही. याआधी 2018मध्ये श्रीलंकेचा संघ टी-20 सामना खेळण्यासाठी पाकमध्ये गेली होती. तसेच, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे संघांनीही पाकिस्तान दौरा केला आहे. याआधी सुरक्षेच्या मुद्द्यावरून संघांनी पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला होता.

वाचा- 'त्याचा काळ आता संपलाय', धोनीला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूची कठोर भूमिका

पाकिस्तानच्या एका वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार श्रीलंका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. यात 2 कसोटी सामने खेळले जाणार आहे. दरम्यान आता पीसीबी इतर संघांनाही पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी आवाहन करणार आहे.

वाचा- क्रिकेटच्या नियमांमध्ये ICCने केले दोन मोठे बदल; निकालावर होणार परिणाम!

वडिलांसमोर मुलाने धावत्या लोकल समोर मारली उडी, ठाणे स्टेशनवरचा LIVE VIDEO

First published: July 19, 2019, 7:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading