मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /पाकिस्तानी विकेटकीपरचा आळशीपणा, ऑस्ट्रेलियाच्या बॅटरला जीवदान; पाहा VIDEO

पाकिस्तानी विकेटकीपरचा आळशीपणा, ऑस्ट्रेलियाच्या बॅटरला जीवदान; पाहा VIDEO

पाकिस्तानी विकेटकिपर मुनीबाने धावबाद करण्यासाठी इतका वेळ घेतला की तेवढ्या वेळेत जोनासेन आरामात क्रीजमध्ये पोहोचली. याचा व्हिडीओ व्हायरल होत असून मुनीबला ट्रोल केलं जात आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 जानेवारी : क्रिकेटमध्ये अनेकदा खराब क्षेत्ररक्षणाचे नमुने बघायला मिळतात. सहज सोपा झेल सोडणं असेल किंवा धावबाद करण्याची संधी गमावणं असेल. आता पाकिस्तानच्या महिला विकेटकिपरच्या आळसामुळे ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर बाद होण्यापासून वाचल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे पाकिस्तानची विकेटकिपर मुनीबा अलीला ट्रोलसुद्धा केलं जात आहे. मुनीबाच्या हातात चेंडू होता पण ऑस्ट्रेलियाच्या जेस जोनासेनला बाद करण्यात तिला यश आलं नाही.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या महिला क्रिकेट संघात शनिवारी सिडनीत तिसरा एकदिवसीय सामना झाला. या सामन्यातला पाकिस्तानी विकेटकिपर मुनीबाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवेळी 50 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जोनासेनने फटका मारला आणि क्रीजमधून पुढे गेली. त्यावेळी मुनीबा स्टम्पच्या पुढे आली आणि चेंडू घेऊन मागे फिरली. पण थेट थ्रो करत धावबाद न करता गुडघा टेकून बेल्स पाडण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : न्यूझीलंडवर आतापर्यंत अशी वेळ कधीच आली नव्हती, नावावर नकोसा रेकॉर्ड

मुनीबाने धावबाद करण्यासाठी इतका वेळ घेतला की तेवढ्या वेळेत जोनासेन आरामात क्रीजमध्ये पोहोचली. जोनासेनने 9 चेंडूत एका चौकारासह नाबाद 12 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला १०१ धावांनी पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक गमावल्यानतंर प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 336 धावा केल्या. बेथ मूनीने 133 तर कॅप्टन मॅग लेनिंगने 72 धावांची खेळी केली होती. प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकिस्तानचा संघ 50 षटकात 7 बाद 235 धावांपर्यंत मजल मारू शकला.

First published:

Tags: Cricket