रावळपिंडी, 01 नोव्हेंबर : कोरोनाव्हायरस (Coronavirus) काळात पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला जात आहे. झिम्बाब्वे (Zimbabwe) विरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत पाकिस्ताननं 26 धावांनी सामना जिंकला. मात्र या सामन्यात सर्वात चर्चेचा विषय ठरला तो इनाम-उल-हक़ (Imam-ul-Haq) याचा रन आउट. पुन्हा एकदा पाकिस्तान खेळाडूंचा हा अजब रनआउट पाहून जगभरात पुन्हा त्यांची खिल्ली उडवली जात आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाकिस्तानच्या डावातील 26व्या ओव्हरमध्ये इमाम-उल-हक़ आणि हारिस सोहेल फलंदाजी करत होते. झिम्बाब्वेच्या रझा गोलंदाजी करत होता, यावेळी इमाम उलनं चेंडू बॅकवर्ड प्वाइंटला मारला. नॉन स्ट्रायकरवर असलेला सोहेल एक धाव घेण्यासाठी पळाला. इमामनेही धाव घेण्याचा इशारा दिला. मात्र तीन-चार पाउलं पळाल्यानंतर इमामला वाटलं एक रन होणार नाही म्हणून तो पुन्हा क्रीझमध्ये आला. मात्र सोहेल तोपर्यंत पोहचला होता. त्यामुळे दोन्ही फलंदाज एकाच टोकाला येऊन उभे राहिले. इमाम दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी पळाला खरा मात्र पोहचू शकला नाही. हा रनआउटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाचा-...तर दिल्ली ठरला असता Playoff गाठणारा दुसरा संघ, वाचा कुठे चुकला श्रेयस अय्यर
— Sandybatsman (@sandybatsman) October 30, 2020
वाचा-3 जागांसाठी 6 संघांमध्ये लढाई, पाहा तुमचा आवडता संघ कसा गाठणार Playoff
या सामन्यात पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करत 281 धावा केल्या. पाककडून हारिस सोहेलनं 71 धावांची खेळी केली तर इमामनं 58 धावा केल्या. पाकनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेकडून ब्रेंडन टेलरनं (112) शतकी खेळी केली. तर, वेस्ली माधवेरे (55) आणि क्रेग इरविन (41) यांनी संघाला विजयाच्या जवळ आणले मात्र आफ्रिदीनं 49 धावा देत 5 विकेट घेत झिम्बाब्वेला 255 धावांवर बाद केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.