19 वर्षीय गोलंदाजानं केली ऐतिहासिक कामगिरी, पण कोणीही घेतली नाही दखल

19 वर्षीय गोलंदाजानं केली ऐतिहासिक कामगिरी, पण कोणीही घेतली नाही दखल

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात लाहोर येथे झालेल्या टी-20 सामन्यात एका युवा गोलंदाजानं कमाल केली.

  • Share this:

लाहोर, 06 ऑक्टोबर : पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात लाहोर येथे झालेल्या टी-20 सामन्यात एका युवा गोलंदाजानं कमाल केली. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकचा जलद गोलंदाज मोहम्मद हसनेन (Mohammad Hasnain) ने ऐतिहासिक कामगिगरी केली आहे. या सामन्यात हसनेनं हॅट्रीक घेत इतिहास रचला. मात्र याची दखल कोणीही घेतली नाही.

मोहम्मद हसनेन टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सर्वात कमी वयात हॅट्रीक घेणारा गोलंदाज बनला आहे. आपल्या दुसऱ्याच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात मोहम्मद हसनेनं कमाल कामगिरी केली. हसनेनं फक्त 39 वर्षांचा आहे. याआधी अफगाणिस्तानचा युवा गोलंदाज राशिद खाननं सर्वात कमी वयात हॅट्रीक घेतली होती.

वाचा-वादळाचं दुसरं नाव मोहम्मद शमी! 5 विकेटसह 'या' विक्रमांवर कोरले नाव

...म्हणून कोणी घेतली नाही दखल

उजव्या हाताचा जलद गोलंदाज मोहम्मद हसनेनं श्रीलंकेच्या डावात 17व्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर भनुका राजपक्साला एलबीडब्लु आऊट केले. यानंतर ओव्हर संपल्यानंतर दुसऱ्या गोलंदाजाला गोलंदाजी दिली. त्यानंतर हसनेनं 19व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली. यात त्यानं पहिल्या दोन चेंडूवर विकेट घेतली. मोहम्मदनं शेहान जयसूर्यी आणि दसुन शानाका यांना बाद केले. दरम्यान हसनेनं हॅट्रीक घेतली, याची कल्पना खुद्द त्यालाही नव्हती. एवढेच नाही तर समालोचकांनाही कळले नाही की हॅट्रीक घेतली आहे. यावर चर्चा झाल्यानंतर हसनेनं जल्लोष केला.

वाचा-टेस्ट क्रिकेटच्या 'वर्ल्ड कप'मध्ये टीम इंडिया सुसाट, पाहा कोण कितव्या स्थानी

9वा खेळाडू बनला हसनेनं

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्रीक घेणारा मोहम्मद हसनेनं जगातला नववा गोलंदाज ठरला आहे. तर, पाकिस्तानचा दुसरा खेळाडू आहे. हसनेनच्या आधी फहीम अशर्रफनं 2017मध्ये श्रीलंकेविरोधतच ही कामगिरी केली होती. दरम्यान दिग्गज लसीथ मलिंगा टी-20मध्ये दोन हॅट्रीक घेणारा पहिला गोलंदाज आहे.

वाचा-विमान नाही, पक्षी नाही; हा तर निघाला सर जडेजा! अफलातून कॅचचा VIDEO

VIDEO : माकडाने पाडला पैशांचा पाऊस, पैसे घेण्यासाठी लोकांची गर्दी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2019 06:30 PM IST

ताज्या बातम्या