VIDEO : जीवघेणा बाउन्सर! हेल्मेटला लागला चेंडू आणि मैदानावरच कोसळला फलंदाज

VIDEO : जीवघेणा बाउन्सर! हेल्मेटला लागला चेंडू आणि मैदानावरच कोसळला फलंदाज

असा खतरनाक बाउन्सर तुम्ही कधीच पाहिला नसेल, VIDEO VIRAL.

  • Share this:

रावळपिंडी, 13 डिसेंबर : पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना रावळपिंडी कसोटीत खेळला जात आहे. हा कसोटी सामना पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण दहा वर्षांनंतर प्रथमच घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला जात आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कसोटी सामन्यात खेळणारे सर्व 11 खेळाडू हे पहिल्यांदा घरच्या मैदानावर कसोटी सामना खेळत आहेत.

दरम्यान, या सामन्याच्या पहिल्या दिवशी काहीतरी घडले, ज्याने सर्वांना चकित केले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शहाने दिमुथ करुणरत्नेला जीवघेणा बाउन्सर टाकला. नसीमचा हा बाउन्सर करुणारत्नेच्या हेल्मेटला लागला आणि तो मैदानावर कोसळला. नसीमच्या गोलंदाजीचे कौतुक होत असले तरी, चेंडू लागून याआधी बऱ्याच फलंदाजांना जखमी व्हावे लागेल आहे, काही खेळाडूंना तर जीवही गमवावा लागला आहे.

 

दरम्यान, या सामन्यात श्रीलंकेचा संघ मजबूत स्थितीत आहे. श्रीलंकेसाठी डावची सुरुवात दिमुथ करुणारत्ने आणि ओशादा फर्नांडोने केली. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी श्रीलंकेवर दबाव आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, परंतु दोन्ही फलंदाजांनी टिकून राहून श्रीलंकेला चांगल्या स्थितीत पोहचवले. याआधी पाकने ऑस्ट्रेलियात दोन कसोटी सामने खेळले होते. आता श्रीलंकेचा संघ 10 वर्षांनी पुन्हा एकदा कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर गेला आहे. याआधी या दोन्ही संघांमध्ये टी-20 मालिका झाली होती. यात श्रीलंकेनं पाकचा पराभव केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2019 10:49 AM IST

ताज्या बातम्या