कॅप्टन कोहलीला थेट पाकिस्तानमधून आलं निमंत्रण! PHOTO VIRAL

कॅप्टन कोहलीला थेट पाकिस्तानमधून आलं निमंत्रण! PHOTO VIRAL

2005-2006नंतर भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला नाही आहे.

  • Share this:

लाहोर, 10 ऑक्टोबर : श्रीलंकेचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. त्यामुळं तब्बल 10 वर्षांनी पाकिस्तानच्या भुमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवण्यात आला होता. दरम्यान तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0नं पाकनं विजय मिळवला. तर, टी-20 मालिकेत श्रीलंकेनं 3-0नं क्लिन स्विप दिला. शेवटचा टी-20 सामना लाहोरच्या गद्दाफी मैदानावर होणार हे. या सामन्या दरम्यान पाकिस्तानी चाहत्याचा एक फोटो व्हारयल झाला आहे. या फोटोमध्ये चाहत्यानं विराटला पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी आमंत्रण दिले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकही द्विपक्षीय मालिका झालेल्या नाहीत. या दोन्ही संघांनी आयसीसीमधली स्पर्धा वगळता इतर सामने खेळलेले नाही. त्यामुळं पाक चाहत्यानं विराटला निमंत्रण देत, “विराट आम्हाला तुला पाकिस्तानमध्ये खेळताना पाहायचे आहे”, असा पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या चाहत्यानं, “आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही पाकिस्तानमध्ये याल आणि क्रिकेट खेळाल. आमचं तुमच्यावर खुप प्रेम आहे आणि आम्ही खुप मोठे चाहते आहोत”, असेही लिहिले आहे.

वाचा-मनीष पांडेला ‘या’ सुंदर अभिनेत्रीनं केलं क्लिन बोल्ड, डिसेंबरमध्ये करणार लग्न!

2005-2006नंतर भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला नाही आहे. 2008मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध चिघळले. त्यामुळं भारतानं पाकिस्तानसोबत एकही सामना न खेळण्याचे ठरवले. तर, 2009मध्ये पाकिस्तान मैदानावर श्रीलंका संघातील खेळाडूंवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर 10 वर्ष पाकिस्तानमध्ये सामना झालेला नाही.

वाचा-मयंक अग्रवालचं शानदार शतक, मोडला सेहवागचा 10 वर्षांपूर्वीचा विक्रम

आशियाई चषकचे यजमानपद पाकिस्तानकडे

आशियाई चषक 2020चे यजमानपद पाकिस्तानकडे देण्यात आले आहे. मात्र यात बीसीसीआयनं खोडा घातला आहे, कारण पाकिस्तानमध्ये आशियाई चषक झाल्यास भारतीय संघ त्यात सामिल होणार नाही. त्यामुळं आता पाकिस्तानमध्ये आशियाई चषक होणार की नाही, याचा निर्णय आशियाई क्रिकेट परिषद घेणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीत, “जर भारतानं कोणता निर्णय घेतला तर त्यानंतर आशियाई क्रिकेट परिषद अंतिम निर्णय घेणार आहे. गेल्या वर्षी भारतात आशियाई कर होणार होता, मात्र शेवटच्या क्षणी दुबईमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळं आताही आशियाई क्रिकेट परिषदेनंतर निर्णय घेतल्यानंतर काय होणार हे ठरवण्यात येईल.

वाचा-आफ्रिकेची चाणाक्यनिती, भारताविरोधात KKRच्या खेळाडूला दिलं संघात स्थान

VIDEO :...म्हणून रिलायन्स जिओ फोन कॉल्ससाठी शुल्क आकारणार!

First published: October 10, 2019, 5:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading