VIDEO : अरेरे! पराभवानंतर भडकला पाकचा चाहता, कर्णधाराला लाथा-बुक्क्यांनी धुतलं

VIDEO : अरेरे! पराभवानंतर भडकला पाकचा चाहता, कर्णधाराला लाथा-बुक्क्यांनी धुतलं

तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेनं पाकिस्तानला 3-0नं क्लिन स्विप दिला.

  • Share this:

लाहोर, 11 ऑक्टोबर : श्रीलंकेनं पाकिस्तान संघाला त्यांच्याच घरच्या मैदानावर नमवलं. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेनं 3-0नं क्लिन स्विप दिला. तर, श्रीलंकेनं पहिल्यांदा 3-0नं टी-20 मालिका जिंकली. सध्या टी-20मध्ये पाकिस्तानचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळं हा पराभव पाक संघासाठी लाजीरवाणा आहे. त्यामुळं पाकचे चाहते भडकले आहेत.

पहिल्या क्रमांकावर असलेल्या संघाचा आठव्या क्रमांकावर असलेल्या संघानं केलेल्या पराभवानंतर चाहते चांगलेच भडकले आहेत. दरम्यान, या पराभवानंतर चाहते एवढे भडकले की, पाक कर्णधार सर्फराज अहमदच्या पोस्टरला लाथा-बुक्क्यांनी धुतलं. या चाहत्यानं सर्फराजचा पोस्टर फाटेपर्यंत त्याला लाथा मारल्या. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चाहता सर्फराजला लाथा बुक्क्यांनी मारताना दिसत आहे.

वाचा-कॅप्टन कोहलीला थेट पाकिस्तानमधून आलं निमंत्रण! PHOTO VIRAL

वाचा-मनीष पांडेला ‘या’ सुंदर अभिनेत्रीनं केलं क्लिन बोल्ड, डिसेंबरमध्ये करणार लग्न!

दरम्यान, तिसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करत 147 धावा केल्या. तर, पाकिस्तान संघाला केवळ 134 धावा करता आल्या. लाजीरवाणी गोष्ट म्हणजे या टी-20 मालिकेत पाकिस्तानला फक्त 4 षटकार लगावले. त्यामुळं चाहत्यांनी पाकिस्तानी संघावर टीका केली आहे. तर, माजी पाक कर्णधार रमीज राझानं प्रशिक्षक मिस्बाह उल-हकला प्रशिक्षक पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

वाचा-इडली, चटनी आणि सांबार! भारताच्या स्टार खेळाडूनं सांगितली शतकाची रेसिपी

VIDEO : भरधाव टेम्पोला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण आग

First published: October 11, 2019, 1:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading