मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

14 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेसमोर बॉल बॉय, आता त्यांच्याचविरुद्ध कॅप्टन, क्रिकेटपटूची प्रेरणादायी कहाणी

14 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेसमोर बॉल बॉय, आता त्यांच्याचविरुद्ध कॅप्टन, क्रिकेटपटूची प्रेरणादायी कहाणी

2007 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये बॉल बॉय असणारा खेळाडू 14 वर्षांनंतर त्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे, तो पण कर्णधार म्हणून.

    लाहोर, 25 जानेवारी : 2007 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये बॉल बॉय ते 2021 साली त्यांच्याचविरुद्ध कॅप्टन, ही प्रेरणादायी कहाणी आहे पाकिस्तानचा क्रिकेटपटू बाबर आझम (Babar Azam) याची. पाकिस्तानमध्ये बऱ्याच कालावधीनंतर एक मोठी टीम क्रिकेट खेळण्यासाठी दाखल झाली आहे, त्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझमचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. याआधी 2007 साली दक्षिण आफ्रिकेची टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेली होती, त्यावेळी बाबर बाऊंड्री लाईनवर बॉल पकडण्यासाठी उभा होता, आता पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिका पाकिस्तानच्या (Pakistan vs South Africa) दौऱ्यावर असताना हाच बाबर आझम कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. 2015 साली झिम्बाब्वेविरुद्ध बाबर आझमने गडाफी स्टेडियममधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. दोनच वर्षांनंतर बाबर पाकिस्तानच्या टीममधला महत्त्वाचा खेळाडू झाला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये बाबरने पाचवं वनडे शतक केलं, याचसोबत तो वनडेमध्ये सगळ्यात जलद 5 शतकं करणारा क्विंटन डिकॉकनंतरचा जगातला दुसरा खेळाडू बनला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझमची एक मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये तो त्याच्या क्रिकेटच्या प्रवासाबाबत बोलत आहे. 'माझा क्रिकेटचा प्रवास 2007 साली सुरू झाला. मला खेळाबाबत आवड होती, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू कसं खेळतात, हे मला बघायचं होतं. दक्षिण आफ्रिकेची टीम जेव्हा पाकिस्तानमध्ये आली होती, तेव्हा मी बॉल बॉय होण्यासाठी कोणाकडे तरी मदत मागितली,' असं बाबर म्हणाला. 'पाकिस्तान-दक्षिण आफ्रिकेची ती टेस्ट मॅच गडाफी स्टेडियमवर झाली. गुलबर्गवरून गडाफी स्टेडियममध्ये मी रोज चालत जायचो,' असं बाबरने सांगितलं. इंझमाम उल हकची शेवटची मॅच ते एबी डिव्हिलियर्सची बॅटिंग, बाबर आझमने क्रिकेटच्या या महान खेळाडूंबाबत रंजक किस्से सांगितले आहेत. 26 जानेवारीपासून पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरूवात होणार आहे. टेस्ट मॅच संपल्यानंतर 11 फेब्रुवारीपासून 3 टी-20 मॅचची सीरिज खेळवली जाईल.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या