VIDEO : आता तर हद्दच केली, विराट पाकिस्तानकडून टी20 वर्ल्ड कप खेळणार?

VIDEO : आता तर हद्दच केली, विराट पाकिस्तानकडून टी20 वर्ल्ड कप खेळणार?

2025 च्या टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये विराट इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानकडून खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 06 सप्टेंबर : भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नंबरची पाकिस्तानी जर्सी घालून दुचाकी चालवत असलेला एक व्हिडिओ वर्ल्ड कप दरम्यान व्हायरल झाली होती. याआधीही पाकिस्तानकडून अशा कुरापती करण्यात आल्या होत्या. आता आणखी एक व्हिडिओ शेअर करून पाकने हद्दच ओलांडली आहे. विराट कोहली 2025 मध्ये पाकच्या संघातून क्रिकेट खेळेल असं म्हटलं आहे.

भारतानं जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान जळफळाट झाला आहे. पाकच्या पंतप्रधानांनी भारतावर अण्वस्त्र हल्ला करू अशी धमकीही दिली होती. त्यांच्या या धमकीचं तिथल्या लोकांनी खरंच मनावर घेतलं. इतकंच काय त्यांनी कल्पना सत्यात उतरली तर काय होईल हेसुद्धा डोळ्यासमोर आणलं. यात पाकिस्तान भारताला अणुयुद्धात पराभूत करेल आणि विराट कोहली पाकिस्तानकडून खेळेल असं सांगणारा व्हिडिओ सध्या त्यांच्याकडून शेअर केला जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक क्रिकेट सामना सुरु आहे. 2025 साली होत असलेला हा टी 20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना आहे. पाकिस्तान यजमान असून श्रीनगरमध्ये ही लढत पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात रंगली असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

सामन्याची कमेंट्री करणाऱ्यानं म्हटलं की, पाकिस्तानकडे दोन खास फलंदाज आहेत. बाबर आझम आणि विराट कोहली. यावेळी व्हिडिओत टीव्ही पाहणारे कुटुंबातील लोक दाखवले जातात. त्यात मुलगी म्हणते की, विराट कोहलीच सामना जिंकून देणार.

दरम्यान, कुटुंबातील दुसरं कोणीतरी म्हणतं की, पहिल्यांदा कोहली भारतासाठी खेळत होता. त्यावेळी मुलगा म्हणतो की, कोण भारत? यानंतर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर कुत्सित हास्य येतं आणि स्क्रिनवर एक नकाशा येतो. यामध्ये भारत आणि बांगलादेशवर हिरवा रंग पसरलेला दिसतो. यातून पाकिस्तान दोन्ही देशांवर राज्य करत असल्याचं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, त्यांच्या या प्रयत्नांची पुरती खिल्ली उडवली जात आहे.

एकीकडे आर्थिक कोंडीत सापडलेल्या पाकिस्तानला पैशांची चणचण भासत आहे. असे असताना अणुयुद्धाच्या गप्पा मारणाऱ्या पंतप्रधान इमरान खान यांनी सपशेल माघार घेतली होती. सध्या पाकिस्तानने त्यांच्या अधिकाऱ्यांना वायफळ खर्च न करण्यास सांगितलं आहे.

VIDEO :...म्हणून 'ते' किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय, पर्यटनमंत्र्यांचा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2019 05:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading