Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

29 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये होणार ICC ची मोठी स्पर्धा, टीम इंडिया खेळायला जाणार?

29 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये होणार ICC ची मोठी स्पर्धा, टीम इंडिया खेळायला जाणार?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती अर्थात आयसीसीने (ICC) 2024 ते 2031 मध्ये होणाऱ्या आठ मोठ्या स्पर्धांचं आयोजन करणाऱ्या देशांची घोषणा केली आहे. यामध्ये पाकिस्तानला 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचं (Champions Trophy 2025 in Pakistan)आयोजन करण्याची जबाबदारी मिळाली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती अर्थात आयसीसीने (ICC) 2024 ते 2031 मध्ये होणाऱ्या आठ मोठ्या स्पर्धांचं आयोजन करणाऱ्या देशांची घोषणा केली आहे. यामध्ये पाकिस्तानला 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचं (Champions Trophy 2025 in Pakistan)आयोजन करण्याची जबाबदारी मिळाली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती अर्थात आयसीसीने (ICC) 2024 ते 2031 मध्ये होणाऱ्या आठ मोठ्या स्पर्धांचं आयोजन करणाऱ्या देशांची घोषणा केली आहे. यामध्ये पाकिस्तानला 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचं (Champions Trophy 2025 in Pakistan)आयोजन करण्याची जबाबदारी मिळाली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 16 नोव्हेंबर : आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती अर्थात आयसीसीने (ICC) 2024 ते 2031 मध्ये होणाऱ्या आठ मोठ्या स्पर्धांचं आयोजन करणाऱ्या देशांची घोषणा केली आहे. 17 सदस्य देशांनी 2024 ते 2031 मध्ये होणाऱ्या आठ स्पर्धांसाठी प्रस्ताव ठेवला होता. यामध्ये पाकिस्तानलाही आयसीसीच्या एका स्पर्धेचं आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. 2024 ते 2031 या कालावधीमध्ये आयसीसी दोन वनडे वर्ल्ड कप, 4 टी-20 वर्ल्ड कप आणि 2 चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहेत. यामध्ये पाकिस्तानला 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचं (Champions Trophy 2025 in Pakistan)आयोजन करण्याची जबाबदारी मिळाली आहे.

पाकिस्तानसाठी या स्पर्धेचं आयोजन खास आहे, कारण 1996 च्या वर्ल्ड कप फायनलनंतर पाकिस्तानमध्ये आयसीसीची कोणतीही मोठी स्पर्धा झाल नाही. सुरक्षेच्या कारणास्तव एका दशकापेक्षा जास्त काळापासून पाकिस्तानमध्ये बड्या टीम क्रिकेट खेळण्यासाठी गेल्या नाहीत. पाकिस्तानला 2008 साली चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन मिळालं होतं, पण ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली. 2009 साली श्रीलंकेच्या टीमवर पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला झाला, यानंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद झालं.

पाकिस्तानला 2011 वनडे वर्ल्ड कपच्या संयुक्त आयोजनाची जबाबदारीही मिळाली होती, पण सुरक्षेच्या कारणामुळे फक्त भारत, श्रीलंका आणि बांगलादेशमध्येच वनडे वर्ल्ड कप खेळवला गेला. 2015-2023 मध्येही पाकिस्तानात एकही आयसीसी ट्रॉफी झाली नाही.

3 मार्च 2009 (श्रीलंकेच्या टीमवर हल्ला)

टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकन टीमच्या बसमध्ये असलेल्या खेळाडू आणि मॅच अधिकाऱ्यांवर हल्ला झाला. दहशतवाद्यांनी लाहोरच्या गडाफी स्टेडियमजवळ हल्ला केला, यात श्रीलंकेचे सहा खेळाडू जखमी झाले. या हल्ल्यात सहा सुरक्षा रक्षक आणि दोन नागरिकांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर ही टेस्ट आणि पुढचा संपूर्ण दौरा रद्द करण्यात आला.

एप्रिल 2009

सुरक्षेच्या कारणामुळे अनेक टीमनी पाकिस्तानचा दौरा करायला नकार दिला, त्यामुळे पाकिस्तानला आपल्या देशात होणाऱ्या सामन्यांचं आयोजन तटस्ठ ठिकाणी करावं लागलं. यातले बहुतेक सामने युएईमध्ये झाले, तर 2010 साली पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियात इंग्लंडमध्ये 2 टेस्ट मॅचची सीरिज झाली होती.

फेब्रुवारी 2013 मध्ये क्रिकेटचं पुनरागमन

अफगाणिस्तान इलेव्हनची टीम पाकिस्तान ए विरुद्ध अनौपचारिक मॅच खेळण्यासाठी फेब्रुवारी 2013 साली पाकिस्तानात गेली होती. लाहोर, मुलतान आणि हैदराबादमध्ये दोन वनडे आणि एक टी-20 मॅच झाली होती.

डिसेंबर 2014

केनियाने पाकिस्तान एविरुद्ध पाच मर्यादित ओव्हरच्या मॅचसाठी पाकिस्तानचा दौरा केला. सगळ्या मॅच लाहोरमध्ये खेळवल्या गेल्या.

मे 2015

2009 सालच्या हल्ल्यानंतर झिम्बाब्वे पाकिस्तानचा दौरा करणारी पहिली टेस्ट टीम ठरली. दोन टी-20 आणि तीन वनडे मॅच लाहोरमध्ये झाल्या होत्या. झिम्बाब्वेच्या टीमला या दौऱ्यात मोठी सुरक्षा देण्यात आली होती. या दौऱ्यातल्या सगळ्या सामन्यांमध्ये पाकिस्तानचा विजय झाला होता, पण शेवटची मॅच पावसामुळे रद्द झाली होती.

5 मार्च 2017

पाकिस्तान सुपर लीगची फायनल लाहोरमध्ये खेळवली गेली. याआधी पीएसएलचे सगळे मोसम युएईमध्ये झाले होते, पण देशाची सुरक्षा आंतरराष्ट्रीय खेळाडूंना दाखवण्यासाठी पाकिस्तानने फायनलचं आयोजन लाहोरमध्ये केलं. मार्लन सॅम्युअल्स, डॅरेन सॅमी आणि क्रिस जॉर्डन हे खेळाडू पीएसएल फायनलसाठी पाकिस्तानमध्ये गेले होते.

सप्टेंबर 2017

दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वात वर्ल्ड इलेव्हन टीमने लाहोरमध्ये तीन टी-20 मॅच खेळल्या. पाकिस्तानने ही सीरिज 2-1 ने जिंकली. या दौऱ्यात जॉर्ज बेली, डेव्हिड मिलर, हाशीम आमला, सॅम्युअल बद्री आणि पॉल कॉलिंगवूड या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश होता.

First published:

Tags: Icc, India vs Pakistan