VIDEO : काय बालिश फिल्डिंग आहे राव! पायाखालून गेला चेंडू तरी बघत बसला खेळाडू

VIDEO : काय बालिश फिल्डिंग आहे राव! पायाखालून गेला चेंडू तरी बघत बसला खेळाडू

अशी फिल्डिंग कोण करतं? हा VIDEO पाहून तुम्हीही लावाल कपाळाला हात.

  • Share this:

लाहोर, 16 मार्च : क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच अकलनीय प्रकार घडत असतात. कधी जबरदस्त कॅच घेतले जातात, तर कधी सोपे कॅच सोडलेही जातात. मात्र सध्या एक वाईट फिल्डिंगचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. खेळाडूच्या डोळ्यासमोर चेंडू असून, त्याला दिसला नाही. हा प्रकार घडला पाकिस्तान सुपर लीग य स्पर्धेत.

एकीकडे कोरोनामुळे सर्व क्रिकेट सामने रद्द झाले असले तरी, पाकिस्तान सुपर लीग मात्र सुरू आहे. या स्पर्धेच्या 28व्या सामन्यात इस्लामाबाद युनायटेडचा वेगवान गोलंदाज अकिफ जावेदने आपल्या क्षेत्ररक्षणात बालिश चूक केली. कराची किंग्सच्या डावाच्या सातव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर फलंदाज इमाद वसीमने एक धाव काढण्याचा प्रयत्न केला. त्याने थर्ड़ लेगला असलेल्या अकिफ जावेदकडे चेंडू मारला. अकिफने बॉल पकडण्याचा प्रयत्न केला पण चेंडू त्याच्या पायाखालून गेला. जावेदनं चेंडू अडवण्याआधीच चौकार गेला. यामुळे कराची किंग्जला 1 धावाच्या बदल्यात 4 धावा मिळाल्या. या सामन्यात कराची किंग्जने इस्लामाबाद युनायटेडचा 4 गडी राखून पराभव केला.

वाचा-VIDEO : ‘कब्र बनेगी तेरी’, जेव्हा ख्रिस गेल फिल्मी बोलतो तेव्हा काय होतं पाहा

वाचा-ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूने भारतीय तरुणीसोबत दुसऱ्यांदा केला साखरपुडा

प्रथम फलंदाजी करताना इस्लामाबाद युनायटेडने 20 षटकांत 6 विकेट गामावत 136 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना 19.2 षटकात हे आव्हा पार करत सामना जिंकला. कराची किंग्जचा सलामीवीर शर्जित खानने केवळ 14 चेंडूत 37 धावा केल्या.

वाचा-कोरोनाच्या भीतीने धोनीने सोडली चेन्नई सुपर किंग्जची साथ, CSKने शेअर केला VIDEO

सध्या पाकिस्तान सुपर लीग अशी एक स्पर्धा आहे जी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतरही खेळली जात आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने रिकाम्या स्टेडियममध्येही हे सामने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तान सुपर लीगचा अंतिम सामना 18 मार्च रोजी खेळला जाईल.

Tags: cricket
First Published: Mar 17, 2020 12:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading