पैशांसाठी पाकनं गाठली खालची पातळी, क्रिकेट खेळण्यासाठी श्रीलंकेला दिली धमकी

पैशांसाठी पाकनं गाठली खालची पातळी, क्रिकेट खेळण्यासाठी श्रीलंकेला दिली धमकी

2009मध्ये पाकमध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवाही हल्ल्यानंतर पाकमध्ये कोणतेही सामने खेळवण्यात आले नव्हते.

  • Share this:

कराची, 15 ऑक्टोबर : पाकिस्तान देशाची परिस्थिती सध्या अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे क्रिकेटचे सामने आजोजित करण्यासाठीही पैसा नाही आहे. यासगळ्यात पैशा जमा करण्यासाठी पाकिस्ताननं अगदी खालची पातळी गाठली आहे.

सध्या श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंध खराब होत आहेत. 2009मध्ये पाकमध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवाही हल्ल्यानंतर पाकमध्ये कोणतेही सामने खेळवण्यात आले नव्हते. दरम्यान तब्बल 10 वर्षांनंतर श्रीलंकेचा संघ पुन्हा एकदा पाकिस्तान दौऱ्यावर गेला. यात त्यांच्यात टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका होणार आहे.

या दोन देशांमध्ये आता टेस्ट चॅम्पियनशीप दरम्यान 2 सामने युएईमध्ये होणार आहेत. यातही या दोन्ही संघात वाद आहेत. कारण पाकचा संघ घरच्या मैदानावर कसोटी सामने खेळू इच्छित आहे तर श्रीलंकेला युएईमध्ये सामने खेळायचे आहेत. त्यामुळं नाराज पीसीबीनं सोमवारी श्रीलंकेला धमकी दिली आहे. पीसीबीनं युएईमध्ये क्रिकेट खेळायचे असेल तर, खर्च अर्धा-अर्धा वाटून घ्यावा लागेल, असे सांगितले. याआधी कराची आणि लाहोरमध्ये या दोन्ही संघांमध्ये टी-20 सामने झाले होते.

वाचा-अरेरे! 150 ओव्हर केली फिल्डिंग पण बॅंटिंगमध्ये पहिल्याच बॉलवर झाला आऊट

युएईमध्ये मालिका झाल्यास खर्च होणार अर्धा-अर्धा

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "पीसीबीचे अध्यक्ष एहसान मनी आणि मुख्य कार्यकारी अध्यक्ष वसीम खान आयसीसीच्या बैठकीसाठी दुबई गेले होते. यावेळी श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांना युएईमध्ये सामने खेळायचे असतील तर, खर्च वाटून घ्यावा लागेल असे सांगण्यात आले", अशी माहिती दिली. दरम्यान पाकिस्तानला आपल्या मायदेशातच सामने खेळायचे आहे. त्यासाठी आयसीसीकडे त्यांनी आपल्या सुरक्षा व्यवस्थेची तयारीही दाखवली.

वाचा-चॅम्पियन खेळाडूनं ड्रेसिंग रूममध्ये केले असे कृत्य की सोडावं लागेल क्रिकेट

श्रीलंकेन बोर्डानं उठवले सवाल

या सगळ्यात श्रीलंका बोर्डाचे प्रमुख शम्मी सिल्वा यांनी पाकिस्तानमध्ये एकदिवसीय आणि टी-20 मालिकेनंतर मायदेशात परतण्यास सांगितले होते. तसेच, हॉटेलमधली सुरक्षा व्यवस्थाही हटवली होतीय. त्यामुळं खेळाडूंना सुरक्षेशिवाय प्रवास करावा लागला होता. श्रीलंका क्रिकेट बोर्डानं पाकिस्तानमध्ये सामने खेळायचे असल्यास खेळाडूंशी आणि अधिकाऱ्यांची चर्चा करून मगच अंतिम निर्णय घेतले जातील अशी माहिती दिली.

2009नंतर पाकिस्तानमध्ये झाली नाही कसोटी मालिका

पाकमध्ये मार्च 2009नंतर एकही कसोटी सामना झाला नाही आहे. लाहोरमध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवाही हल्ल्यानंतर कोणताच संघ पाक दौऱ्यावर गेला नाही. या हल्ल्यात श्रीलंकेचे खेळाडू जखमी झाले होते तर, 6 पोलिस अधिकारी मारले शहीद झाले होते.

वाचा-'जगातले सर्व कर्णधार मठ्ठ, विराट तेवढा शहाणा'; शोएबच्या VIDEOने खळबळ

VIDEO : विधानसभा निवडणुकीत वंचितचं भविष्य काय? रामदास आठवले म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2019 05:01 PM IST

ताज्या बातम्या