World Cup 2019 : पाकिस्तानच्या 'या' 15 शिलेदारांमध्ये हुकुमी एक्काच गायब

World Cup 2019 : पाकिस्तानच्या 'या' 15 शिलेदारांमध्ये हुकुमी एक्काच गायब

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 16 जूनला सामना होणार आहे.

  • Share this:

कराची, 18 एप्रिल : यंदा इंग्लंडमध्ये 30 मेपासून होऊ घातलेल्या विश्वचषकासाठी जवळजवळ सर्व संघानी आपल्या 15 शिलेदारांची नावं घोषित केली आहेत. यात आज साऊथ आफ्रिकेपाठोपाठ पाकिस्तान क्रिकेट बोर्डनं आपल्या संघाची घोषणा केली. मात्र, यात पाकिस्तान संघासाठी महत्वपुर्ण ठरणारा जलद गोलंदाज मोहम्मद आमिर याला संघात स्थान देण्यात आलेलं नाही.पाकिस्तानच्या संघाचे नेतृत्व सर्फराझ अहमदकडे सोपवण्यात आले आहे. या संघात शोएब मलिक आणि मोहम्मद हफिझसारखे अनुभवी खेळाडू आहे. पण मोहम्मद आमिरला डावलण्याचा फटका पाकिस्तान संघाला नक्कीच बसेल. दरम्यान, पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेसाठी आमीरची निवड करण्यात आली आहे, पण विश्वचषकाच्या संघातून मात्र त्याला डच्चू देण्यात आला आहे.

आमिरला त्याच्या गेल्या वर्षातल्या खराब फॉर्ममुळं संघातून बगळण्यात आल्याचं निवड समिती प्रमुख इंजमाम-उल-हक यानं सांगितलं. तर, त्याच्या बदल्यात संघात ऑलराऊंडर इमाद वसीम याला फिटनेस टेस्ट नापास झाला असूनही संघात घेतलं आहे.

पाकिस्तानचा संघ विस्तृतपणे पाहिल्यास, फखर जमां आणि इमाम-उल-हक यांच्यानंतर आबिद अली याला रिजर्व ओपनर म्हणून स्थान दिलं आहे. तर, मधल्या फळीत बाबर आजम, शोएब मलिक आणि मोहम्मद हफीज यांना जागा देण्यात आली आहे.

दरम्यान आमिरला वगळण्यात आले असले तरी, जलद गोलंदाज म्हणून हसन अली, शाहीन अफरीदी, जुनैद खान आणि मोहम्मद हुसनैन असे चार गोलंदाज आहेत. हे सर्व गोलंदाज 140 किमी. प्रति तासाच्या वेगानं गोलंदाजी करतात.

पाकिस्तानचा संघ : सरफराज अहमद, आबीद अली, बाबर आझम, फईम अश्रफ, फखार झमान, हारिस सोहेल, हसन अली, इमाद वासिम, इमाम उल-हक, जुनैद खान, मोहम्मद हाफीज, मोहम्मद हुसैन, शोएब खान, शाहीन शहा अफ्रिदी, शोएब मलिकVIDEO: कोणतही चिन्हं दाबलं तरी मत कमळालाच जातं: प्रकाश आंबेडकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 07:26 PM IST

ताज्या बातम्या