पाकिस्तानी खेळाडूंचं English पुन्हा चर्चेत, यावेळी सईद अजमल निशाण्यावर!

पाकिस्तानचे खेळाडू त्यांच्या इंग्रजीबद्दल कायमच चर्चेत असतात, ज्यामुळे त्यांच्यावर ट्रोल व्हायची वेळ येते. यावेळी पाकिस्तानचा माजी स्पिनर सईद अजमल (Saeed Ajmal) ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. याला कारण ठरलं त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू उस्मान ख्वाजाला (Usman Khwaja) दिलेली मुलाखत.

पाकिस्तानचे खेळाडू त्यांच्या इंग्रजीबद्दल कायमच चर्चेत असतात, ज्यामुळे त्यांच्यावर ट्रोल व्हायची वेळ येते. यावेळी पाकिस्तानचा माजी स्पिनर सईद अजमल (Saeed Ajmal) ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. याला कारण ठरलं त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू उस्मान ख्वाजाला (Usman Khwaja) दिलेली मुलाखत.

  • Share this:
    मुंबई, 18 जून : पाकिस्तानचे खेळाडू त्यांच्या इंग्रजीबद्दल कायमच चर्चेत असतात, ज्यामुळे त्यांच्यावर ट्रोल व्हायची वेळ येते. यावेळी पाकिस्तानचा माजी स्पिनर सईद अजमल (Saeed Ajmal) ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. याला कारण ठरलं त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू उस्मान ख्वाजाला (Usman Khwaja) दिलेली मुलाखत. सईद अजमलने त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक दिग्गजांना बॉलिंगने त्रास दिला, पण त्याच्या दुसरा बॉलमध्ये तो वादात अडकला. आयसीसीने 2014 साली त्याच्यावर बेकायदेशीर बॉलिंग ऍक्शनमुळे कारवाई केली. आयसीसीच्या या कारवाईनंतर त्याने पुनरागमन केलं, पण त्याला आधीसारखी कामगिरी जमली नाही, त्यामुळे 2015 नंतर तो पुन्हा कधीच पाकिस्तानकडून खेळला नाही. उस्मान ख्वाजासोबत बोलताना सईद अजमलने दुसरा बाबत प्रतिक्रिया दिली. आयसीसीने दुसरा टाकायला बंदी घालणं चुकीचं आणि अन्यायकारक असल्याचं सईद अजमल म्हणाला. 'मी लहान मुलांना बॉलिंग शिकवू शकतो, तेदेखील 15 डिग्रीच्या आत. पण आता आयसीसी तो बॉलच टाकायचा नाही असं सांगत आहे,' असं वक्तव्य सईद अजमलने केलं, पण हे बोलताना तो सायन्स इज अ मॅन (Science is a man) असं म्हणाला, ज्यामुळे त्याच्यावर ट्रोल व्हायची वेळ आली. उस्मान ख्वाजाच्या युट्यूब चॅनलवर सईद अजमल बोलत होता. सईद अजमलचं हे वक्तव्य काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झालं. अनेकांनी उस्मान ख्वाजाने त्याचं हसू आवरल्याबद्दल त्याचं कौतुकही केलं. सईद अजमल पाकिस्तानसाठी 35 टेस्ट, 113 वनडे आणि 64 टी-20 सामने खेळला. यात त्याने 178 टेस्ट विकेट, 184 वनडे विकेट आणि 85 टी-20 विकेट घेतल्या. आयसीसीने आपल्यावर कारवाई केली नसती, तर आपण आणखी धोकादायक झालो असतो, असं 43 वर्षांचा सईद अजमल या मुलाखतीमध्ये म्हणाला. काहीच दिवसांपूर्वी सईद अजमल याने भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विनबाबत (R Ashwin) वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. अश्विनवर बॉलिंग ऍक्शन प्रकरणात कारवाई होऊ नये म्हणून त्याला 6 महिने क्रिकेटपासून लांब ठेवण्यात आल्याचा दावा अजमलने केला होता.
    Published by:Shreyas
    First published: