Home /News /sport /

पाक संघ व्यवस्थापनाने माझ्यावर लावला होता बलात्काराचा खोटा आरोप - शोएब अख्तर

पाक संघ व्यवस्थापनाने माझ्यावर लावला होता बलात्काराचा खोटा आरोप - शोएब अख्तर

2005 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मला संघातून फक्त अनफिट आहे म्हणून काढलं नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आणि पाकिस्तानी कर्णधाराने माझ्यावर बलात्काराचा आरोप लावून मला संघाबाहेर केलं होतं.

    नवी दिल्ली, 08 जून : हेलोच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरने हेलो लाईव्हवर आज मोठा गौप्यस्फोट केला. 2005 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मला संघातून फक्त अनफिट आहे म्हणून काढलं नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आणि पाकिस्तानी कर्णधाराने माझ्यावर बलात्काराचा आरोप लावून मला संघाबाहेर केलं होतं. आजपर्यंत त्यांनी हे आरोप मागे घेतले नसल्याचंही तो म्हणाला. पाक संघातील खेळाडूच्या एका चुकीमुळे हे खोटे आरोप माझ्यावर करण्यात आले आणि मला संघाबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. मी हा प्रसंग कधीच कोणत्या मीडियामध्ये प्रसिद्ध केला नाही, पण आज मी हा प्रसंग Helo वर सांगतोय असं तो म्हणाला. पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड आणि संघातील खेळाडू अनेकदा माझ्या मीडियातील प्रसिद्धीमुळे मला त्रास देण्याचा प्रयत्न करायचे. पण मला मिळालेली प्रसिद्धी आणि यश हे माझ्या मेहनतीचे फळ आहे. मला त्रास देणारे ते खेळाडू आज नामशेष आहे तर मला आजही संपूर्ण क्रिकेटविश्वात ओळखलं जातं. तसंच भारतातही मला कधी द्वेषाला सामोरं जावं लागलं नाही. भारतात मला नेहमी प्रेम मिळाले आहे. सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत पण कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढू - जयंत पाटील या लाईव्हमध्ये शोएबने विराट आणि बाबर यांच्यातील तुलना चुकीचं आहे असं सांगितलं. शोएबच्या मते विराटला कसोटी, एकदिवसीय सामने मोठ्या प्रमाणात खेळण्याची संधी मिळते. पण पाकिस्तानात आता क्रिकेटची परिस्थिती बेताची आहे. खेळाडूंना म्हणावी तशी संधी उपल्बध होत नाही. आणि पाकिस्तान क्रिकेटच्या तिजोरीत खडखडाट असल्याने खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची जास्त संधी मिळत नाही. त्यामुळे विराट आणि बाबर यांच्यातील तुलना चुकीची आहे. दोन्ही खेळाडू आपआपल्या जागेवर उत्तम कामगिरी करत असून आपआपल्या देशाचे नाव उंचावत आहे. शोएबने भारतीय कर्णधारांविषयी बोलताना सांगितले की जर आज महेंद्रसिंग धोनीने संघाला नाव मिळवून दिले तर सौरव गांगुलीने भारताच्या संघाचा पाया रचला होता. फरार नीरव मोदीला सगळ्यात मोठा धक्का, सर्व मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश सौरवने भारतीय संघासाठी त्यावेळी योग्य निर्णय घेतले. आधी पाकिस्तान संघ भारताला सहज हरवून जायचा पण सौरवने तयार केलेल्या भारतीय संघाने पाकिस्तानला अनेकवेळा पराभूत करुन स्व:ताला सिद्ध केले आहे. राजावाडी रुग्णालयातून पॉझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह गायब, किरीट सोमय्यांचा आरोप संपादन - रेणुका धायबर
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Shoaib akhtar

    पुढील बातम्या