'पाकिस्तान संघ प्रोफेशनल नाही, पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत वठणीवर आणणार'

पाकिस्तानचा संघ ICC Cricket World Cupमध्ये चांगली कामगिरी करू शकलेला नाही.

News18 Lokmat | Updated On: Jul 22, 2019 08:11 PM IST

'पाकिस्तान संघ प्रोफेशनल नाही, पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत वठणीवर आणणार'

नवी दिल्ली, 22 जुलै : पाकिस्तानचा संघ ICC Cricket World Cupमध्ये चांगली कामगिरी करू शकलेला नाही. पाक संघाला सेमीफायनलमध्येही जागा निश्चित करता आली नाही. त्यामुळे लीग स्टेजमध्येच त्यांचे आव्हान संपुष्टात आले. त्यामुळं पाकिस्तान संघाच्या कर्णधारावर, खेळाडूंवर आणि फिटनेसवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. दरम्यान आता पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि पंतप्रधान इमरान खान यांनी पाकिस्तान संघाबाबत मोठी घोषणा केली आहे.

1992मध्ये पाकिस्तानला संघाला वर्ल्ड कप जिंकून देणारे इमरान खान यांनी संघाच्या खेळाबद्दल बोलताना, संघात मोठे बदल करण्याची वेळ असल्याची घोषणा केली. सध्या अमेरिक दौऱ्यावर असलेल्या इमरान यांनी, "वर्ल्ड कप संपल्यानंतर मी असा निर्णय घेतला आहे की, पाकिस्तान संघाला मी सुधारणार. पुढच्या वर्ल्ड कपमध्ये तुम्ही जो संघ पाहणार तो प्रोफेशनल असणार. माझे शब्द तुम्ही लक्षात ठेवा. मी पाकिस्तान संघाला ठिक करणारच", अशी घोषणा केली.

Loading...

वाचा-धोनीच्या लष्कर ट्रेनिंगची इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूनं केली मस्करी, झाला ट्रोल

पाकिस्तानी संघातच गडबड

इमरान खान यांनी यावेळी आपल्या संघावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पाकिस्तानी संघ आणि कर्णधार यांच्यावर याआधी शोएब अख्तर यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळं पाकिस्तान संघात नक्की काय गडबड आहे याचा शोध आता पंतप्रधान इमरान खान घेणार आहेत.

वाचा-आता नो-बॉलवरून होणार नाही राडा, ICCने घेतला 'हा' मोठा निर्णय!

पाकिस्तान संघात होणार मोठे बदल

वर्ल्ड कपनंतर शोएब मलिक यानं निवृत्ती जाहीर केली. तसेच मोहम्मद हाफिजही निवृत्ती घेण्याच्या मार्गावर आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज यालाही डच्चू दिली जाऊ शकतो. पाकिस्तान बोर्ड सध्या एकदिवसीय आणि टी-20 असे दोन संघ ठेवण्याच्या विचारात आहे. यासंबंधी लवकरच पीसीबी निर्णय घेणार आहे.

वाचा- मुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट!

VIDEO : MTNL इमारतीत आग कशी लागली? बचावलेल्या कर्मचाऱ्यांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: imran khan
First Published: Jul 22, 2019 08:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...