Home /News /sport /

48 वर बॅटिंग करत होता फलंदाज, अचानक LIVE सामन्यात आला श्वान आणि..., वाचा पुढे काय घडलं

48 वर बॅटिंग करत होता फलंदाज, अचानक LIVE सामन्यात आला श्वान आणि..., वाचा पुढे काय घडलं

अर्धशतक पूर्ण करण्यासाठी फलंदाजाला हवे होते 2 रन्स आणि एका श्वानामुळे थांबवला सामना.

    कराची, 16 नोव्हेंबर : कोरोनाव्हायरस असतानाच पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर खेळाडू खेळताना दिसत आहेत. नुकताच IPL टी-20 क्रिकेट स्पर्धेचा 13 वा सिझन दणक्यात पार पडला आणि आता पाकिस्तान सुपर लीग या टी-20 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेली ही स्पर्धा 8 महिन्यांनंतर पुन्हा आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी मुल्तान सुलतान आणि कराची किंग्ज यांच्यात क्वालिफायर सामना खेळण्यात आला, हा सामना कराची किंग्जने सुपर ओव्हरमध्ये जिंकला. दोन्ही संघांनी शानदार खेळी दाखवली. कराची किंग्जकडून बाबर आझमने अप्रतिम अर्धशतक मारला. परंतु, या सामन्यात आपले अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याला बरीच वेळ प्रतीक्षा करावी लागली. खरं तर 142 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कराचीचे स्कोर 13 ओव्हर मध्ये 3 गडी बाद होऊन 90 धावा इतका होता. वाचा-तिकडे शिवम दुबेनं फटाके फोडले, इकडे ट्रोल झाला कॅप्टन कोहली; वाचा काय आहे प्रकरण वाचा-LIVE सामन्यातच फलंदाजी सोडून टॉयलेटच्या दिशेनं पळाला खेळाडू, VIDEO VIRAL 14 व्या ओव्हरमध्ये सामना थांबवला गेला बाबर आझम उत्कृष्ट फलंदाजी करीत होता. त्याला अर्धशतकासाठी अवघ्या दोन धावांची गरज होती. त्याच वेळी मैदानावरील कॅमेरामनने आपले फोकस एका श्वानाकडे वळवले ज्यामुळे हा सामना 14 व्या ओव्हरमध्ये थांबवावा लागला. या सामन्या दरम्यान श्वान मैदानाच्या मध्यभागी येऊन बसला होता. श्वानाकडे सर्वांचे लक्ष गेल्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर पुन्हा सामना सुरू झाला. यामुळे आझमला त्याचा अर्धशतक पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन धावांची प्रतीक्षा करावी लागली. वाचा-डेव्हिड वॉर्नरसोबतच्या सेक्स लाईफबद्दल बोलली पत्नी कॅन्डिस आझमने कराची किंग्जला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी 53 चेंडूत 65 धावा केल्या. यानंतरही या संघाला 21 चेंडूत 25 धावांची गरज होती. तर कराचीने पुढच्या 17 चेंडूत 4 गडी गमावले. ज्यामुळे हा सामना टाय झाला. शेवटच्या चेंडूला पाच धावा हव्या होत्या आणि इमाद वसीमने एक चौकार ठोकला. यानंतर कराची किंग्जने सुपर ओव्हरमध्ये हा सामना अखेरीस जिंकला.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या