पाकिस्तानला मोठा धक्का, वर्ल्ड कपनंतर 'या' मॅच विनर खेळाडूनं घेतली निवृत्ती

पाकिस्तानला मोठा धक्का, वर्ल्ड कपनंतर 'या' मॅच विनर खेळाडूनं घेतली निवृत्ती

36 कसोटी सामन्यात 119 विकेट घेणाऱ्या आमीरनं वयाच्या 27व्या वर्षी निवृत्ती घोषित केली.

  • Share this:

कराची, 26 जुलै : वर्ल्ड कप 2019मध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर पाकिस्तान संघावर टिकास्त्र सुरु झाले आहे. यातच आता पाकिस्तानचा मॅच विनर गोलंदाज मोहम्मद आमीरनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शुक्रवारी याबाबत आमीरनं अधिकृत घोषणा केली आहे. असे असले तरी,आमीर स्थानिक क्रिकेट खेळत राहणार आहे.

आमीरनं 36 कसोटी सामने खेळले आहेत. यात 30.47च्या सरासरीनं 2.85च्या इकॉनॉमीनं 119 विकेट घेतल्या आहेत. 27 वर्षीय आमीरनं पाकिस्तानसाठी एकदिवसीय आणि टी-20 सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. मात्र पाकिस्तानमध्ये कसोटी सामनेच होत नसल्यामुळं आमीरनं आपली निवृत्ती जाहीर केली आहे.

आपल्या निवृत्तीबाबत बोलताना आमीरनं, "कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणे ही भाग्याची गोष्ट आहे. पण मी आता निवृत्ती घेण्याचा विचार केला आहे, असे असले तरी स्थानिक क्रिकेटमध्ये मी खेळत राहणार आहे", असे मत व्यक्त केले.

वाचा-'सरफराजचं कर्णधारपद काढून घ्या नाहीतर...', माजी क्रिकेटर भडकला

टी-20 वर्ल्ड कप पाकिस्तानला जिंकवणे प्रमुख ध्येय

निवृत्तीनंतर आमीरनं पाकिस्तानसाठी वर्ल्ड कप जिंकणे हे माझे प्रमुख ध्येय आहे. आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान चांगली कामगिरी करेल, असे मत त्यानं व्यक्त केले. वर्ल्ड कप 2019मध्ये पाकिस्ताननं निराशाजनक कामगिरी केली. 2015मध्ये सेमीफायनल गाठणाऱ्या पाकिस्तानला लीग स्टेजमध्ये बाहेर पडावे लागले.

वाचा- कोण होणार टीम इंडियाचा कोच? सेहवाग, जयवर्धनेसह 'ही' 4 नावे चर्चेत

वाचा- विराट-रोहितमधील मतभेद टोकाला, हिटमॅनने अनुष्काच्या माध्यमातून असा काढला राग

VIDEO: ट्रॅफिक कंट्रोल करणाऱ्या या आजीबाई नक्की आहेत तरी कोण?

Published by: Akshay Shitole
First published: July 26, 2019, 4:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading