Home /News /sport /

पाकिस्तानचा हसन अली पुन्हा वादात, आता तर पत्रकाराशीच घेतला पंगा, VIDEO

पाकिस्तानचा हसन अली पुन्हा वादात, आता तर पत्रकाराशीच घेतला पंगा, VIDEO

पाकिस्तानचा फास्ट बॉलर हसन अलीवर (Hasan Ali) मागच्या काही काळापासून टीका होत आहे. पाकिस्तान सुपर लीग 2021 (PSL)च्या प्लेयर्स ड्राफ्टनंतर मीडियाशी बोलताना हसन अलीने पत्रकाराशीच पंगा घेतला.

    मुंबई, 13 डिसेंबर : पाकिस्तानचा फास्ट बॉलर हसन अलीवर (Hasan Ali) मागच्या काही काळापासून टीका होत आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) में महागडी बॉलिंग, सेमी फायनलमध्ये मॅथ्यू वेडचा कॅच सोडल्यानंतर हसन अली पाकिस्तानी चाहत्यांच्या निशाण्यावर आला. आता हसन अली पुन्हा एकदा वादात सापडला आहे. पाकिस्तान सुपर लीग 2021 (PSL)च्या प्लेयर्स ड्राफ्टनंतर मीडियाशी बोलताना हसन अलीने पत्रकाराशीच पंगा घेतला. इस्लामाबाद युनायटेडचा बॉलर हसन अलीने पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली, पण एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर द्यायला त्याने नकार दिला. या पत्रकाराने त्याचा प्रश्न पूर्णही केला नाही, त्याआधीच हसन अलीने त्याला अडवलं आणि पुढचा प्रश्न प्लीज, अशी प्रतिक्रिया दिली. हसन अलीच्या या वक्तव्यानंतर पत्रकारानेही ही वागणूक चांगली नसल्याचं त्याला सांगितलं. पत्रकाराच्या या वक्तव्यावर हसन अली संतापला आणि त्याने पहिले तुम्ही ट्विटरवर चांगल्या गोष्टी लिहा, मग मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देईन. कोणाबाबत वैयक्तिक बोलू नका. पीसीबी तुम्हाला रोखू शकत नाही, पण आमच्याकडे तो अधिकार आहे, असं वक्तव्य केलं. हसन अलीने ज्या पत्रकाराच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, त्याचं नाव अनस सईद सांगितलं जात आहे. या पत्रकाराने हनस अलीने कोरोना (Covid-19) प्रोटोकॉलचं पालन न केल्याबद्दल त्याच्यावर टीका केली होती. पत्रकाराने हसन अलीचा एक व्हिडिओ शेयर केला होता, ज्यात त्याने मास्क न घातलेल्या हसन अलीवर टीका केली होती, तसंच नियमाचं पालन न केल्यामुळे दंडही भरावा लागू शकतो, असं पत्रकार या व्हिडिओमध्ये म्हणाला होता. पत्रकाराच्या या व्हिडिओवर हसन अलीने तेव्हाही प्रतिक्रिया दिली होती. जुन्या व्हिडिओवरून ड्रामा करू नका, पहिले सत्य जाणून घे. खोटा मसाला द्यायची गरज नाही, असं हसन अली म्हणाला होता.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या