मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

पाकिस्तानची शेजारी देशांसोबत हातमिळवणी, BCCI ला धक्का द्यायची तयारी

पाकिस्तानची शेजारी देशांसोबत हातमिळवणी, BCCI ला धक्का द्यायची तयारी

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शेजारी देशांना सोबत घेऊन बीसीसीआयला (BCCI) धक्का देण्याची रणनिती आखली आहे. 2024 ते 2031 या कालावधीमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सहा आयसीसी (ICC Events) स्पर्धांचं आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 2 जुलै: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शेजारी देशांना सोबत घेऊन बीसीसीआयला (BCCI) धक्का देण्याची रणनिती आखली आहे. 2024 ते 2031 या कालावधीमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सहा आयसीसी (ICC Events) स्पर्धांचं आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामध्ये तीन ठिकामी 2025 आणि 2029 चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्यासाठी पाकिस्तान आग्रही आहे. याचसोबत त्यांनी 2026 आणि 2028 टी-20 वर्ल्ड कप आणि 2027 तसंच 2031 चा 50 ओव्हरच्या वर्ल्ड कप आयोजनाचीही ऑफर दिली आहे.

या सहा स्पर्धा खेळवण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड श्रीलंका (Sri Lanka), बांगलादेश (Bangladesh) आणि युएईसोबत (UAE) हातमिळवणी करण्यासाठी तयार आहे. सोबतच पाकिस्तानमध्ये कराची, लाहोर, मुलतान आणि रावळपिंडी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची स्टेडियम आहेत आणि पेशावरमध्येही लवकरच स्टेडियम बांधून पूर्ण होईल, असा दावा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केला आहे.

यावर्षीचा टी-20 वर्ल्ड कप युएईमध्ये होणार आहे, तर वनडे वर्ल्ड कप बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये आयोजित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. पाकिस्तानची टीम 2021-2022 मध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानात खेळणार आहे, त्यासाठी बोर्डाने आंतरराष्ट्रीय दर्जाची सुरक्षा एजन्सी असलेल्या इस्टर्न स्टार इंटरनॅशनलसोबत करार करणणार आहे. 2017 साली पाकिस्तानमध्ये वर्ल्ड इलेव्हन टीमने दौरा केला होता. त्यावेळी बोर्डाने या एजन्सीला 1.4 मिलियन डॉलर दिले होते.

First published:

Tags: Bangladesh cricket team, BCCI, Cricket, Icc, India, Pakistan, Pakistan Cricket Board, Sports, Sri lanka, UAE