अब्दुल कादिरच्या चॅलेंजला सचिनने असं दिलं होतं उत्तर!

अब्दुल कादिरच्या चॅलेंजला सचिनने असं दिलं होतं उत्तर!

पाकचे माजी क्रिकेटपटू अब्दुल कादिर यांचं वयाच्या 63 व्या वर्षी निधन झालं. त्यांनी एका कार्यक्रमात सचिन तेंडुलकरला दिलेल्या चॅलेंजबद्दल सांगितलं होतं.

  • Share this:

मुंबई, 07 सप्टेंबर : पाकिस्तानचे दिग्गज फिरकीपटू अब्दुल कादिर यांचं शुक्रवारी वयाच्या 63 व्या वर्षी निधन झालं. आपल्या फिरकीच्या जोरावर फलंदाजांची भंबेरी उडवणाऱ्या या गोलंजानं लाहोरमध्ये अखेरचा श्वास घेतला. अव्वल फिरकीपटू शेन वॉर्नसुद्धा अब्दुल कादिरला गुरु मानत होता. त्यांच्या निधनानंतर जगभरातील क्रिकेटपटूंनी शोक व्यक्त केला आहे. इंग्लंडविरुद्ध एका डावात 56 धावा देत 9 गडी बाद करण्याची कामगिरी त्यांनी केली होती.

अब्दुल कादिर यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसोबतचा एक खास किस्सा सांगितला होता. वर्षभरापूर्वी एका कार्यक्रमात कादिर यांनी सांगितलं होतं की, आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कारकिर्दीच्या सुरुवातीलासुद्धा सचिन चॅलेंजपासून मागे हटन नव्हता. त्यांना एका सामन्यावेळी घडलेला प्रसंग सांगितला होता. पेशावरमध्ये 30 षटकांचा एक सामना झाला होता. यामध्ये सचिनने कादिर यांच्या गोलंदाजीवर 4 षटकार मारले होते.

कादिर यांनी सांगितलं होतं की, सचिनबद्दल मला आपुलकी वाटायची. तो लहान होता आणि चांगला खेळत होता. एका सामन्यात पावसानं 30 षटकांचा खेळ करण्यात आला होता. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला होता. के श्रीकांत आणि सचिन तेंडुलकर फलंदाजीला आले होते. जेव्हा मी गोलंदाजीला आलो तेव्हा के श्रीकांतला एकही धाव काढू दिली नाही.

षटक संपल्यानंतर कादिर सचिनच्या जवळ गेले आणि म्हणाले की, हा एकदिवसी सामना नसेल तर तु माझ्या पुढच्या षटकात षटकार मारण्याचा प्रयत्न कर. जर तु हे केलंस तर यशस्वी होशील. सचिनने यावेळी त्यांना काही उत्तर दिलं नाही पण पुढच्या एकाच षटकात तीन षटकार मारले असं कादिर यांनी सांगितलं होतं.

सचिनने त्या सामन्यात 18 चेंडूत 53 धावा केल्या होत्या. यात त्यानं एकाच षटकात 27 धावा काढल्या होत्या. यामध्ये 4 षटकार आणि एक चौकार मारला होता.

चंद्रयान मोहिमेचं कवी कसं वर्णन करतील, पाहा UNCUT पंतप्रधान मोदींचं भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2019 01:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading