Home /News /sport /

पाकिस्तानने 'काश्मीर'मध्ये ओढलं विराटचं नाव, कोहलीला दिली ही ऑफर!

पाकिस्तानने 'काश्मीर'मध्ये ओढलं विराटचं नाव, कोहलीला दिली ही ऑफर!

पाकिस्तानने (Pakistan) पुन्हा एकदा काश्मीरचा (Kashmir) मुद्दा उकरून काढला आहे, यावेळी तर त्यांनी काश्मीर प्रकरणात थेट टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचंच (Virat Kohli) नाव घेतलं आहे.

    मुंबई, 17 मे : पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उकरून काढला आहे, यावेळी तर त्यांनी काश्मीर प्रकरणात थेट टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचंच (Virat Kohli) नाव घेतलं आहे. काश्मीर प्रीमियर लीगच्या (Kashmir Premiere League) दुसऱ्या मोसमासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) विराट कोहलीला खेळण्याचं आमंत्रण दिलं आहे. केपीएलचे अध्यक्ष आरिफ मलिक यांनी विराटला ही ऑफर दिली आहे. काश्मीर प्रीमियर लीगचं आयोजन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड करतं. मागच्या वर्षी या स्पर्धेचं पहिल्यांदा आयोजन करण्यात आलं होतं. विराट कोहलीला या लीगच्या दुसऱ्या मोसमात खेळण्यासाठी औपचारिक आमंत्रण दिलं जाईल, असं आरिफ मलिक यांनी सांगितलं. 'मोहम्मद रिझवानने एक चांगला संदेश दिला आहे, क्रिकेट या सगळ्यापासून लांब असलं पाहिजे, त्यामुळे आम्ही विराटला कमीत कमी एक मॅच खेळण्यासाठी तरी ये, असं आमंत्रण देत आहोत. आमच्याकडून आम्ही शांतीसाठीचा हात पुढे करत आहोत. याचा स्वीकार करायचा का नाही, हे आता त्याच्यावर अवलंबून आहे,' असं आरिफ मलिक म्हणाले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध खूप खराब आहेत. दोन्ही देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून द्विपक्षीय सीरिज होत नाही. इतर भारतीय खेळाडूंसोबत खेळण्यासाठीही आम्ही तयार आहोत. दोन्ही देशांमध्ये क्रिकेट खेळवलं गेलं तरच संबंध सुधारतील, अशी प्रतिक्रिया आरिफ मलिक यांनी दिली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डकडून आयोजित करण्यात आलेल्या मागच्या काश्मीर प्रीमियर लीगमध्ये 6 टीम सहभागी झाल्या होत्या. रावलकोट हॉक्सने पहिली काश्मीर प्रीमियर लीग जिंकली होती. केपीएलच्या दुसऱ्या मोसमात आणखी दोन नव्या टीम खेळणार आहेत. 1 ऑगस्टपासून या स्पर्धेची सुरूवात होणार असून 14 ऑगस्टला फायनल खेळवली जाणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs Pakistan, Virat kohli

    पुढील बातम्या