कराची, 23 जानेवारी : श्रीलंकेनंतर आता भारताने न्यूझीलंडलासुद्धा घरच्या मैदानावर हरवलं आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताच्या या जबरदस्त कामगिरीनंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघावर टीका केली आहे. भारतासमोर न्यूझीलंडच्या संघाने सपशेल शरणागती पत्करली पण त्याच न्यूझीलंडने गेल्या महिन्यात पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केलं होतं.
कनेरियाने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांनी केलेल्या तयारीत असलेला फरकही सांगितला आहे. भारताने श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध सलग मालिका विजय मिळवला आहे. तिन्ही विभागात सामूहिक प्रयत्नाच्या जोरावर गेल्या पाच एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला. तर पाकिस्तानची घरच्या मैदानावर परिस्थिती कठीण आहे. न्यूझीलंडविरुद्ध त्यांना 2-1 असा पराभव पत्करावा लागला.
हेही वाचा : 26 जानेवारीला ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान सामन्याचे आयोजन, एश्ले गार्डनर भडकली
पाकिस्तानी संघाच्या फलंदाजीवर टीका करताना कनेरियाने म्हटलं की, पाकिस्तानला टी२० कर्णधारपदाबाबत विचार करायला हवा. जर बाबर आझमकडून नेतृत्व काढून घेतलं तर द्यायचं कोणाकडे? आपण एकदिवसीय सामन्यात मोठी धावसंख्या उभारली का? कुणी द्विशतक केलं? प्रभावी म्हणावी अशी कामगिरी होती का? असे प्रश्न त्याने विचारले.
आता भारताकडे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आपल्या इतर खेळाडूंना खेळवण्याची संधी असेल. पण पाकिस्तानमध्ये सगळे फक्त आपल्यापुरतं पाहतात. बाबर आझम त्याच्या 50-60 धावा करणं सुरू ठेवतो आणि संघाला त्याचा काही फायदा नाही. अशा कामगिरीमुळे संघाचे फक्त नुकसान होत आहे असंही कनेरिया म्हणाला.
कनेरियाने म्हटलं की, भारताने ऋषभ पंतच्या दुर्दैवी अपघातानंतर ईशान किशनला तयार करण्यास सुरु केलंय. तर पाकिस्तान मोहम्मद हारिसला त्याचं कौशल्य, प्रतिभा दाखवण्याची संधीच देत नाहीय. भारताला माहिती आहे की ऋषभ पंत वर्ल्ड कपसाठी उपलब्ध नसेल त्यामुळे इशान किशनला केएल राहुलचा बॅकअप म्हणून तयार केलं जात आहे. पण आपण काय करत आहे? आम्ही फक्त रिझवानसोबत आहे आणि मोहम्मद हारिसला काहीच संधी देत नाहीय. पक्षपातीपणा तुम्हाला वर्ल्ड कपसाठी संघ तयार करण्यास मदत करणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket