मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Inzamam-ul-Haq Heart Attack: माजी कर्णधार इंझमाम उल-हकला हृदयविकाराचा झटका; 3 दिवसांपासून सुरू होता त्रास

Inzamam-ul-Haq Heart Attack: माजी कर्णधार इंझमाम उल-हकला हृदयविकाराचा झटका; 3 दिवसांपासून सुरू होता त्रास

Inzamam-ul-Haq Heart Attack: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि मॅचविनर बॅट्समन इंझमाम उल हकला हृदयविकाराचा  झटका आला आहे.

Inzamam-ul-Haq Heart Attack: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि मॅचविनर बॅट्समन इंझमाम उल हकला हृदयविकाराचा झटका आला आहे.

Inzamam-ul-Haq Heart Attack: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि मॅचविनर बॅट्समन इंझमाम उल हकला हृदयविकाराचा झटका आला आहे.

इस्लामाबाद, 28 सप्टेंबर: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि मॅचविनर बॅट्समन इंझमाम उल हकला हृदयविकाराचा  झटका आला आहे. मागील तीन दिवसांपासून इंझमामच्या छातीत वेदना सुरु होत्या. त्यानंतर सोमवारी त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला आहे. त्यानंतर इंझमाम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

क्रिकेट विश्वातील ईएसपीएन आणि क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, इंझमामला सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती इंझमाम यांच्या प्रवक्त्याने दिली आहे. इंझमाम यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष देऊन आहेत. याबाबत वृत समोर येताच क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. अनेक क्रिकेट चाहत्यांनी इंझमाम यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना सुरू केली आहे.

इंझमाम उल हक हा पाकिस्तानचा मॅचविनर बॅट्समन असून 2000 सालानंतरच्या संघात तो आघाडीचा फलंदाज होता. 51 वर्षीय इंझमामने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत अनेक सामने एकतर्फी जिंकून दिले आहेत. इंझमाम हा पाकिस्तानच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने 375 एकदिवसीय क्रिकेट सामन्यात तब्बल 11 हजार 701 धावा कुटल्या आहेत. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानी संघाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूच्या यादीत इंझमाम तिसऱ्या स्थानावर आहे. इंझमामने 119 कसोटीत 8 हजार 829 धावा केल्या आहेत.

हेही वाचा-RCB कडून IPL मध्ये हॅट्रिक घेणारा हर्षल पटेल ठरला तिसरा गोलंदाज

2007 साली इंझमामने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतरही, तो क्रिकेटपासून फारसा दूर गेला नाही. त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी संलग्न राहून अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. 2016 ते 2019 दरम्यान इंझमाम पाकिस्तानी क्रिकेट बोर्डात संघ निवडप्रक्रियेचा प्रमुख म्हणून कामकाज पाहिलं आहे. तसेच तो अफगाणिस्तानचा मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिलं आहे.

First published:
top videos

    Tags: Pakistan