मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

क्रिकेटच्या मैदानात पुन्हा धडाडली 'रावळपिंडी एक्स्प्रेस', 46 वर्षांच्या शोएब अख्तरचा Video Viral

क्रिकेटच्या मैदानात पुन्हा धडाडली 'रावळपिंडी एक्स्प्रेस', 46 वर्षांच्या शोएब अख्तरचा Video Viral

46 वर्षीय शोएब अख्तर पुन्हा दिसला मैदानात; Video झाला व्हायरल

46 वर्षीय शोएब अख्तर पुन्हा दिसला मैदानात; Video झाला व्हायरल

पाकिस्तानचा 46 वर्षीय माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) पुन्हा एकदा मैदानात गोलंदाजी करताना दिसला आहे. सध्या त्याचा गोलंदाजी करतेला व्हिडी ओ सोशल मीडियावर व्हायरल (Shoaib Akhtar comeback on cricket ground) होत आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 06 ऑक्टोबर: पाकिस्तानचा 46 वर्षीय माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar New Video) पुन्हा एकदा मैदानात गोलंदाजी करताना दिसला आहे. सध्या त्याचा गोलंदाजी करतेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Shoaib Akhtar comeback on cricket ground) होत आहे.

शोएब नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतो. काही ना काही शेअर करत शोएब आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. दरम्यान, शोएब अख्तरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तो अख्तर इस्लामाबाद क्लबच्या नवीन मैदानावर गोलंदाजी करताना दिसत आहे. त्याच्या बॉलिंग अॅक्शनमध्ये जरासुद्धा फरक जाणवला नाही. त्याच्या या व्हिडीओमुळे आंतरराष्ट्रीय सामन्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

अख्तरने 2011 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विश्वविक्रम अख्तरच्या नावावर आहे. अख्तरने पाकिस्तानसाठी एकूण 46 कसोटी, 163 वनडे आणि 15 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 178, वन डेत 247 आणि ट्वेंटी-20त 19 विकेट्स आहेत.

हे वाचा- IPL 2021: रोहित शर्माची अचूक चाल, T20 World Cup पूर्वी टीम इंडियाला Good News

यूएईत होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धींना एकाच गटात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना 2019नंतर पुन्हा एकदा हाय व्होल्टेज सामन्याची मेजवानी मिळणार आहे. याबद्दल बोलताना अख्तरने खोचक मत व्यक्त केले होते. ''ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचा फायनल मुकाबला भारत आणि पाकिस्तान यांच्यात होईल व त्यात टीम इंडियाचा पराभव होईल, असे मला वाटत असल्याचे मत अख्तरने व्यक्त केले होते.

First published:

Tags: Shoaib akhtar, T20 world cup