इमामनंतर आता आणखी एका पाक क्रिकेटरची रासलीला, मुलींना फसवल्याचं ट्वीट व्हायरल

इमामनंतर आता पाकिस्तानच्या जलद गोलंदाजावर मुलींना फसवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2019 05:43 PM IST

इमामनंतर आता आणखी एका पाक क्रिकेटरची रासलीला, मुलींना फसवल्याचं ट्वीट व्हायरल

कराची, 27 जुलै : वर्ल्ड कपमध्ये मानहानीकारक कामगिरी केल्यानंतरही पाक क्रिकेटच्या अडचणी काही थांबत नाही आहेत. पाकिस्तानचा सलामी फलंदाज इमाम-उल-हकवर 8 महिलांनी प्रेमात विश्वासघात केल्याचा आरोप केला होता. या महिलांनी ट्विटरवर व्हॉट्सअॅपचे चॅट व्हायरल केले आहेत. आता या सगळ्यात आणखी एक पाक खेळाडू अडकला आहे. वर्ल्ड कपमध्ये विक्रमी गोलंदाजी करणारा युवा गोलंदाज शाहीन आफ्रिदीवर आता मुलींना फसवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

इमामनंतर आता शाहिन आफ्रिदीवर शुक्रवारी ट्वीटवर एका युजरनं फसवणूकीचे आरोप लगावले. ट्विटरवर हे शाहिनसोबतचे व्हॉट्सअॅप चॅटही व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी इमामवरचे चॅटही अशाच प्रकारे व्हायरल झाले होते.

शाहिनने केले ट्वीट डिलीट पण व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल

शाहिनवर आरोप करणारी महिलेने, "शाहिन आफ्रिदी पाकिस्तान क्रिकेटमधले मोठे नाव आहे. काही खेळाडू मैदानावर नेहमी चांगली कामगिरी करत नागीत, ते नेहमी मुलींशी फ्लर्ट करत असतात. आपल्या पैशांचा वापर ते मुलींना फसवण्यासाठी करतात, आणि त्यांना फसवतात". मात्र या प्रकरणाबाबत याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. तसेच, पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं यासंबंधी कोणतीही माहिती वा इमामची चौकशी केलेली नाही.

Loading...

वाचा-रोहित-विराट वाढता वाद, बीसीसीआय प्रमुखांनी केला मोठा खुलासा

वर्ल्ड कपमध्ये केली होती विक्रमी कामगिरी

शाहिननं वर्ल्ड कप 2019मध्ये विक्रमी कामगिरी केली होती. 19 वर्षीय शाहिननं 5 सामन्यात 16 विकेट घेतल्या आहेत. तसेच त्याच्या नावावर 3 कसोटी सामन्यात 12 आणि 19 एकदिवसीय सामन्यात 40 विकेट घेतल्या आहेत.

इमामवरही झाले होते असे आरोप

र्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा संघ खेळत असताना इमाम याच चार मुलींसोबत बोलत असल्याचाही दावा केला आहे. व्हायरल झालेल्या या स्क्रिनशॉटनुसार इमाम या मुलीला 'बेबी' या नावाने संबोधत आहे. तर, दुसऱ्या स्क्रिनशॉटमध्ये इमाम आपल्या ब्रेक अपबद्दल बोलत आहे. इमामवर विश्वासघात केल्याचा आरोप केलेल्या महिलेने आपल्याकडे त्याच्या विरोधात व्हिडिओ आणि फोटो असल्याचाही दावा केला आहे. इमार एकाचवेळी 8 मुलींना फसवत असल्याचाही आरोप इमामवर केला आहे.

वाचा-अनुष्का शर्माचा हिटमॅनवर पलटवार, रोहित-विराट वाद चिघळला!

VIDEO: मुसळधार पावसामुळे डोंबिवली, दिवा परिसरात कंबरेएवढं पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2019 05:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...