IPL खेळण्यासाठी 'या' पाक खेळाडूला सोडायचा आहे देश?

IPL खेळण्यासाठी 'या' पाक खेळाडूला सोडायचा आहे देश?

27 वर्षीय आमीरनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 जुलै : भारतातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून आयपीएलकडे पाहिले जाते. यात स्थानिक, युवा खेळाडूंना आपली शैली दाखवण्याची संधी तर मिळतेच त्याचबरोबर विदेशी खेळाडूंनाही आपली आक्रमकता दाखवण्याची संधी मिळते. मात्र पहिल्या हंगामानंतर पाकिस्तानी खेळाडूंवर भारतात खेळण्यात बंदी घालण्यात आली. मात्र आता पाकिस्तानचा आघाडीचा गोलंदाज आयपीएल खेळण्यासाठी देश सोडणार आहे. हा खेळाडू आहे पाकिस्तानचा जलद गोलंदाज मोहम्मद आमीर.

आमीरने काही दिवसांपूर्वी वयाच्या 27 वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आमीरच्या या निर्णयामुळे अनेक माजी खेळाडूंना धक्का बसला. पाकिस्तानी मीडियाने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार, आमीरला ब्रिटनचे नागरिकत्व हवे आहे, त्यामुळे त्याने निवृत्ती जाहीर केली. आमीरची बायको ब्रिटनची असल्यामुळे त्याने नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे. मात्र आता खरं तर आमीरनं आयपीएल खेळण्यासाठी पाकिस्तान सोडायचे असल्याच्या बातम्या आल्या आहेत.

वाचा- विराटच्या कर्णधारपदावरून गावस्कर आणि मांजरेकर यांच्यात जुंपली

आमीरनं 36 कसोटी सामने खेळले आहेत. यात 30.47च्या सरासरीनं 2.85च्या इकॉनॉमीनं 119 विकेट घेतल्या आहेत. 27 वर्षीय आमीरनं पाकिस्तानसाठी एकदिवसीय आणि टी-20 सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. मात्र पाकिस्तानमध्ये कसोटी सामनेच होत नसल्यामुळं आमीरनं आपली निवृत्ती जाहीर केली आहे.

वाचा- 'याच्यासारखं दुर्दैव काहीच नाही', रोहितसोबतच्या वादावर विराटनं केला मोठा खुलासा

...आणि आमीर होणार आयपीएलसाठी पात्र

आमीरला जर ब्रिटिश नागरिकत्व मिळाले तर त्याला पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटही खेळता येणार नाही. याआधी पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अझहर महमूद आयपीएल खेळला आहे. अझहरने ब्रिटिश नागरिकत्व मिळवत आयपीएलमध्ये किग्स इलेव्हन पंजाबकडून खेळला होता. त्यामुळे आमीरला जर ब्रिटिश नागरिकत्व मिळाले तर तो भारतात आयपीएल खेळू शकतो. मात्र यासाठी त्याला पाकिस्तानकडून कोणत्याही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळता येणार नाही.

वाचा- IND vs WI : विराटनं सांगितली टीम इंडियाच्या कोचसाठी पहिली पसंती!

VIDEO: देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार आमने-सामने, सकाळच्या टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ipl
First Published: Jul 30, 2019 09:15 AM IST

ताज्या बातम्या