जबरा फॅन! लग्न सोडून होणाऱ्या बायकोसोबत बघत बसला मॅच, PHOTO VIRAL

क्रिकेटचा जबरा चाहता. असा PHOTO तुम्ही कधीच पाहिला नसले.

News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2019 07:32 PM IST

जबरा फॅन! लग्न सोडून होणाऱ्या बायकोसोबत बघत बसला मॅच, PHOTO VIRAL

सिडनी, 07 नोव्हेंबर : क्रिकेटचे चाहते जगभरात आहेत, यात काही नवीन नाही. मात्र, अशा देशांमध्येही क्रिकेटचे फॅन आहेत, ज्या देशात क्रिकेट खेळतही नाही. पण क्रिकेटचे चाहते एक सामना पाहण्यासाठी कोणत्याही स्थरावर जाऊ शकतात. असाच एक प्रकार घडला पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या टी-20 सामन्यात.

पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यानं असे काही केले की तो क्रिकेटचा जबरा फॅन असल्याचे जगजाहीर झाले. घडलं असं की, पाकिस्तानचा हा चाहता अमेरिकेत राहतो. पण आपल्या लग्नातही हा अवलिया सामना पाहण्याचा मोह आवरू शकला नाही. आयसीसीनं या जबऱ्या फॅनचे फोटो ट्विटरवर टाकले. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये हा अवलिया आपल्या बायकोसोबत लग्न सुरू असताना मॅच पाहताना दिसत आहे. या फोटोला काही चाहत्यांनी ट्रोलही केले आहे.

पाकिस्तानचा क्रिकेट संघ मोठ्या ब्रेकनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. 2009-2015मध्ये सुरक्षेच्या कारणावरून आंतरराष्ट्रीय सामने नाही झाले होते. दरम्यान आता पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झाल्यामुळं चाहते खुश आहेत. मात्र या सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवता आला नाही. ऑस्ट्रेलियानं 7 विकेटनं हा सामना जिंकला. मात्र तरी, क्रिकेटचा हा अवलिया आपल्या देशाचा हा सामना पाहण्यास विसरला नाही.

वाचा-‘…तर मी स्मिथचं थोबाड फोडलं असत’, शोएब अख्तरच्या धक्कादायक विधानानं खळबळ

नुकतेच लग्न झालेल्या हसननं आपल्या पत्नीसोबत क्रिकेट पाहतानाचे फोटो एका पत्रासह आयसीसीला पाठवले. हसनं असे या चाहत्याचे नाव असून अमेरिकेत लग्न झाल्यानंतर गृहप्रवेशा दरम्यान तो मॅच पाहत बसला. आयसीसीनं हे फोटो शेअर करत कपल गोल्स असे कॅप्शन या फोटोंना दिले आहे.

Loading...

वाचा-मॅच फिक्सिंग, विराटच्या संघातील खेळाडूसह तिघांना अटक

वाचा-ऐतिहासिक कसोटी सामन्याची सुरू आहे ग्रँड तयारी; होणार गोल्डन टॉस!

मात्र ऑस्ट्रेलिया विरोधात पाकची खेळी चाहत्यांना आवडली नसावी. बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाक संघाला सात विकेटनं पराभव स्विकारावा लागला. त्यामुळं या मालिकेत ऑस्ट्रेलियानं 1-0नं आघाडी घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2019 07:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...