'विराट'सेनेची देशभक्ती पाकला झोंबली, आयसीसीकडे करणार तक्रार

..तर पाकिस्तानचा संघ दंडाला काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरेल, पाकिस्तानच्या मंत्र्याचे ट्वीट

News18 Lokmat | Updated On: Mar 9, 2019 03:31 PM IST

'विराट'सेनेची देशभक्ती पाकला झोंबली, आयसीसीकडे करणार तक्रार

नवी दिल्ली, 9 मार्च : पुलवामात झालेल्या हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून भारतीय क्रिकेट संघाने शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारताच्या लष्कराची कॅप घालून संघ मैदानात उतरला. भारतीय संघाने वाहिलेली श्रद्धांजली पाकला रुचली नाही. त्यानंतर पाकिस्तानने आक्षेप घेत भारतीय संघावर कारवाई करण्याची मागणी आयसीसीकडे केली आहे.

पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, हे फक्त क्रिकेट नाही. मला आशा आहे की खेळातून होत असलेल्या राजकारणावर आयसीसी कठोर कारवाई करेल. जर भारतीय संघाने असे प्रकार बंद केले नाही तर पाकिस्तान याच्या मैदानात काळी पट्टी बांधून उतरेल. भारताकडून काश्मीरमध्ये होत असलेल्या अत्याचाराविरोधात आम्ही आवाज उठवू अशी गरळ पाक मंत्र्यांनी ओकली आहे. त्याचबरोबर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही याबाबत आवाज उठवावा अशी मागणी केली आहे.

शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने सर्व खेळाडूंनी कॅप दिली. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भारतीय संघाने अशा प्रकारे अभिवादन केले होते. या सामन्यातील मानधनही खेळाडूंनी शहिदांच्या कुटुंबीयांना देण्यात आले. तसेच कर्णधार विराट कोहलीने राष्ट्रीय संरक्षण निधीत देशवासियांनीदेखील मदत करावी असे आवाहन केले होते.Loading...

पुलवामात 14 फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 हून अधिक जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताच्या हवाई दलाने हवाई हल्ला करून दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त केला होता. यानंतर दोन्ही देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान भारताने आगामी विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळू नये असाही सूर देशभर उमटला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 9, 2019 03:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...