निवृत्ती घेताच पाकिस्तानी खेळाडूनं व्यक्त केली देश सोडण्याची इच्छा!

वर्ल्ड कप 2019मध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर पाकिस्तानचा मॅच विनर गोलंदाज मोहम्मद आमीरनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2019 04:05 PM IST

निवृत्ती घेताच पाकिस्तानी खेळाडूनं व्यक्त केली देश सोडण्याची इच्छा!

वर्ल्ड कप 2019मध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर पाकिस्तानचा मॅच विनर गोलंदाज मोहम्मद आमीरनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शुक्रवारी याबाबत आमीरनं अधिकृत घोषणा केली आहे. असे असले तरी,आमीर स्थानिक क्रिकेट खेळत राहणार आहे.

आमीरनं 36 कसोटी सामने खेळले आहेत. यात 30.47च्या सरासरीनं 2.85च्या इकॉनॉमीनं 119 विकेट घेतल्या आहेत. 27 वर्षीय आमीरनं पाकिस्तानसाठी एकदिवसीय आणि टी-20 सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. मात्र पाकिस्तानमध्ये कसोटी सामनेच होत नसल्यामुळं आमीरनं आपली निवृत्ती जाहीर केली आहे.

दरम्यान निवृत्ती घेतल्यानंतर आमीर पाकिस्तान सोडण्याच्या तयारीत आहे. आमिरला आता पाकिस्तानकडून खेळायचे नाही आहे. त्यामुळं त्यानं ब्रिटनकडे नागरिकत्वाची मागणी केली आहे.

द ट्रिब्युननं दिलेल्या माहितीनुसार, आमीरनं 2016मध्ये ब्रिटिश नागरिकत्व असलेल्या नरगिस मलिकशी लग्न केले होते. त्यामुळं आमीरनं ब्रिटेनकडे नागरिकत्वाची मागणी केली आहे. सध्या आमीर लंडनमध्ये घर शोधत आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतली असली तरी 27 वर्षीय आमीर टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेट खेळणार आहे. तसेच, आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान चांगली कामगिरी करेल, असे मत त्यानं व्यक्त केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2019 04:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...