लव्ह, सेक्स और धोका! 8 मुलींना प्रेमात फसवल्याचा पाक क्रिकेटरवर आरोप; Whatsapp चॅट लीक

लव्ह, सेक्स और धोका! 8 मुलींना प्रेमात फसवल्याचा पाक क्रिकेटरवर आरोप; Whatsapp चॅट लीक

पाकिस्तानी क्रिकेटपटूवर एकाच वेळी 8 महिलांचा विश्वासघात केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 जुलै : पाकिस्तानचा सलामी फलंदाज इमाम-उल-हकवर प्रेमात विश्वासघात केल्याचा आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे हा आरोप एका महिलेने नाही तर तब्बल 7-8 जणींनी केला आहे. दरम्यान या महिलांनी ट्विटरवर व्हॉट्सअॅपचे चॅट व्हायरल केले आहेत.

सध्या व्हायरल होत असलेल्या या चॅटनुसार इमाम एकाचवेळी चार मुलींसोबत एकाच प्रकारचे संभाषण करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान हे फोटो खरे आहेत की नाही, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. तसेच, पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं यासंबंधी कोणतीही माहिती वा इमामची चौकशी केलेली नाही. दरम्यान ज्या महिलेने इमामवर हे आरोप केले आहेत, त्यांनी या घटना सहा महिन्यांपूर्वीच्या असल्याचे सांगितले आहे.

तसेच, वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा संघ खेळत असताना इमाम याच चार मुलींसोबत बोलत असल्याचाही दावा केला आहे. व्हायरल झालेल्या या स्क्रिनशॉटनुसार इमाम या मुलीला 'बेबी' या नावाने संबोधत आहे. तर, दुसऱ्या स्क्रिनशॉटमध्ये इमाम आपल्या ब्रेक अपबद्दल बोलत आहे.

इमामवर विश्वासघात केल्याचा आरोप केलेल्या महिलेने आपल्याकडे त्याच्या विरोधात व्हिडिओ आणि फोटो असल्याचाही दावा केला आहे. इमार एकाचवेळी 8 मुलींना फसवत असल्याचाही आरोप इमामवर केला आहे.

इमाम पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम-उल-हकचा भाचा आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघात त्याला स्थान देण्यावरूनही अनेक वाद झाले होते. मात्र, त्यानं आपल्या फलंदाजीनं स्वत:ला सिध्द केले. इमामनं आतापर्यंत 36 एकदिवसीय सामन्यात 54.58च्या सरासरीनं 7 शतक लगावले आहेत.

ऑन ड्युटी टिक टॉक VIDEO करणं महिला पोलिसांच्या अंगलट, निष्काळजीपणा भोवला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2019 02:48 PM IST

ताज्या बातम्या