रोहित शर्मासोबत तुलना, पाकिस्तानचा क्रिकेटपटू म्हणतो...

रोहित शर्मासोबत तुलना, पाकिस्तानचा क्रिकेटपटू म्हणतो...

पाकिस्तानचा क्रिकेटपटू बाबर आझम याची तुलना कायमच विराट कोहलीसोबत केली जाते. यानंतर आता पाकिस्तानच्या आणखी एका नवोदित खेळाडूची रोहित शर्मासोबत तुलना केली जात आहे.

  • Share this:

मुंबई, 11 ऑक्टोबर : पाकिस्तानचा क्रिकेटपटू बाबर आझम याची तुलना कायमच विराट कोहलीसोबत केली जाते. यानंतर आता पाकिस्तानच्या आणखी एका नवोदित खेळाडूची रोहित शर्मासोबत तुलना केली जात आहे. पाकिस्तानचा क्रिकेटपटू हैदर अली (Haider Ali) अंडर-19 वर्ल्ड कपपासून चर्चेत आला. वर्ल्ड कपमधल्या कामगिरीमुळे हैदर अलीला पाकिस्तानच्या इंग्लंड दौऱ्यातल्या टीममध्ये संधी मिळाली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त एकच मॅच खेळल्यानंतर हैदर अलीची तुलना रोहित शर्मा (Rohit Sharma)सोबत व्हायला लागली.

हैदर अली याने रोहित शर्मा आपला रोल मॉडेल असल्याचं सांगितलं. रोहित शर्माचं क्लिन हिटिंग आणि मोठ्या खेळींमुळे रोहित शर्मा आपल्याला आवडतो, असं हैदर अली जून महिन्यात म्हणाला होता. पण रोहितसोबत तुलना होत असल्यामुळे अस्वस्थ वाटतं, अशी प्रतिक्रिया हैदर अलीने दिली आहे.

'रोहित शर्मा माझा रोल मॉडेल आहे. खेळाडू म्हणून तो मला आवडतो. मलाही रोहित प्रमाणेच वरच्या फळीत आक्रमक सुरुवात करायची इच्छा आहे. मलाही त्याच्यासारखेच शॉट मारायचे आहेत. तो क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो,' असं वक्तव्य हैदर अलीने केलं.

इंग्लंड दौऱ्यातल्या टी-20 सीरिजमधून हैदर अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 20 वर्षांच्या हैदर अलीने इंग्लंडविरुद्ध ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात अर्धशतकही केलं होतं. यानंतर त्याच्या बॅटिंगची तुलना रोहितसोबत होऊ लागली. पण रोहितसोबत होत असलेली माझी तुलना योग्य नाही. रोहित उत्कृष्ट खेळाडू आहे. मला अजून बराच प्रवास करायचा आहे, असं हैदर अलीने सांगितलं.

पाकिस्तानसाठी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये आपल्याला खेळायचं असल्याचं हैदर अली म्हणाला. प्रथम श्रेणीमध्येही माझी कामगिरी चांगली झाली. प्रशिक्षक मोहम्मद वसीम यांनीही मला योग्य मार्गदर्शन केलं. प्रशिक्षकांनी आत्मविश्वास वाढवला, तर खूप फरक पडतो, असं मत हैदर अलीने मांडलं.

Published by: Shreyas
First published: October 11, 2020, 8:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या