Home /News /sport /

…आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू म्हणाला ‘जय श्रीराम’, VIDEO VIRAL

…आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू म्हणाला ‘जय श्रीराम’, VIDEO VIRAL

पाकिस्तानी क्रिकेटपटूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    नवी दिल्ली, 30 डिसेंबर : पाकिस्तानसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा हिंदू फिरकीपटू दानिश कनेरिया गेल्या काही दिवसांपासून चर्चेच आहे. याआधी दानिशनं पाक क्रिकेट संघात त्याच्यासोबत भेदभाव केल्याचे मान्य केले होते. हे प्रकरण शोएब अख्तरनं एका कार्यक्रमात सांगितले त्यानंतर पाक संघावर जगभरातून टीका करण्यास सुरुवात केली. दरम्यान आता दानिशचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दानिशनं आपल्या यु-ट्युब चॅनलवर एक व्हिडीओ अपलोड केला होता. या व्हिडीओमध्ये दानिश जय श्रीराम म्हणताना दिसला. रविवारी अपलोड केलेल्या या व्हिडीओची सुरुवात दानिशनं जय श्रीरामनं केली. दानिशचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओचे समर्थन भारतीय चाहत्यांनी सुध्दा केले आहे. दरम्यान दानिशनं याआधी बऱ्याचवेळा आपल्या व्हिडीओची सुरुवात जय श्रीराम म्हणत केली आहे. दानिश पाककडून क्रिकेट खेळणारा दुसरा हिंदू खेळाडू होता. वाचा-दानिश प्रकरणावर शोएब अख्तरचा यु-टर्न, नव्या VIDEOमध्ये केलं भलतंच स्पष्टीकरण दानिशचे खरे नाव दिनेश होते? पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणाऱ्या दानिशनं अनेकवेळा आपल्या फिरकीच्या जोरावर देशाला सामना जिंकून दिला. मात्र सध्या दानिश हिंदू खेळाडूंना पाकमध्या मिळणाऱ्या वागणुकीबाबत वाचा फोडल्यानंतर चर्चेत आला. दरम्यान दानिशनं अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये आपल्या खऱ्या नावाबाबत लोकांना सांगितले. दानिशनं यावेळी बरेच चाहते पाककडून खेळण्यासाठी मी नाव बदलले का, असा सवाल विचारत आहेत. वाचा-ऋषभ पंत, सरफराज आणि झिव्हाचे मजेशीर प्रसंग, हे मजेशीर VIDEO पाहून पुन्हा हसाल वाचा-CAA आणि NRC वादात पाकची उडी, क्रिकेटवरून जावेद मियाँदादनं ओकली गरळ पीसीबीनं दानिशची केली नाही मदत दानिशनं (Danish Kaneria) या व्हिडीओमध्ये, 'जेव्हा 2010मध्ये माझे नाव फिक्सिंगमध्ये घेण्यात आले होते तेव्हा पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं मला कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. या आरोपांनंतर मी पीसीबीच्या ऑफिसमध्ये फोनही केला होता, मात्र हा तुझा वैयक्तिक प्रश्न आहे असे म्हणत मला मदत नाकारली”, असे सांगितले. वाचा-टी-20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाला मोठा झटका, भुवनेश्वर कुमारला झाला गंभीर आजार पाकमध्ये हिंदू क्रिकेटपटूचा 'छळ', शोएब अख्तरनं शेअर केला होता VIDEO दरम्यान, भाजपकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये पाकिस्तानमध्ये हिंदूंचा कसा छळ होतो हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरचा हा व्हिडिओ भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालविय यांनी शेअर केला आहे. यामध्ये शोएब अख्तरने सांगितले आहे की, कशा प्रकारे हिंदू असल्याने दानिश कनेरियाला पाकिस्तानचे खेळाडू एकटे पाडतात. तसेच त्याच्यासोबत कसे वागायचे हेदेखील अख्तरने सांगितले आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या