मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

पाकिस्तानच्या 'या' क्रिकेटरने टेस्ट फॉरमॅटमधून घेतली निवृत्ती, टि्वट करत सांगितले कारण

पाकिस्तानच्या 'या' क्रिकेटरने टेस्ट फॉरमॅटमधून घेतली निवृत्ती, टि्वट करत सांगितले कारण

Usman Shinwari Announces Retirement

Usman Shinwari Announces Retirement

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज उस्मान शिनवारी (Usman Shinwari Announces Retirement) याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

दुबई, 17 नोव्हेंबर: यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) पाकिस्तान संघाची अप्रतिम कामिगिरी पाहायला मिळाले. विजयी घोडदौड कायम ठेवत संघाने सेमीफायनलपर्यंत मजल मारली पण पदरी निराशा पडली. त्यानंतर आता पाकिस्तानचा संघ बांग्लादेशविरुद्धच्या (PAK vs BAN) टेस्टसिरीजसाठी सज्ज झाला आहे. तत्पूर्वी, संघाला धक्का देणारी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज उस्मान शिनवारी (Usman Shinwari Announces Retirement) याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

बांग्लादेशविरुद्धच्या टेस्टसाठी पाकिस्तानने नुकताच आपला संघ जाहिर केला. संघ जाहिर होताच शिनवारीने आपण टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. उस्मानने ट्विट करत निवृत्ती घेण्यामागचे कारणही स्पष्ट केले आहे.

काय आहे कारण?

मी पाठीच्या दुखापतीतून सावरलो आहे. आता मी एकदम फिटअसून खेळण्यासाठी पात्र आहे. पण माझ्या डॉक्टरांसह फिजियोने मला कसोटी क्रिकेटपासून लांब राहण्याचा सल्ला दिल्याने मी मर्यादीत षटकांच्या क्रिकेट प्रकारात अधिक प्रगतीसाठी हा निर्णय घेत आहे. अशा आशयाची पोस्टा उस्मानने ट्विटरवर केली आहे.

उस्मानने 2013 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने पाकिस्ताकडून 17 वनडे. 16 टी20 आय, आणि 1 टेस्ट मॅच खेळली आहे. वनडेमध्ये त्याचे प्रदर्शन चांगले आहे. त्याने 18.6 सरासरीने 34 विकेट घेतल्या आहेत. त्याने 2019 मध्ये पाकिस्तानकडून अखेरच खेळला होता.

चॅम्पियन होण्याचं त्यांचं स्वप्न अधुरं

पाकिस्तानने यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. त्यांनी ग्रुप स्टेज मध्ये जोरदार प्रदर्शन करत 5 मॅचेस आपल्या नावावर केल्या होत्या. मात्र, सेमीफायनलमध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाने धक्का दिला. आणि चॅम्पियन होण्याचं त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं.

पाकिस्तानचा संघ आता बांग्लादेश दौऱ्यावर आहे. बांग्लादेशविरुद्ध 19 नोव्हेंबरपासून टी20 सीरीज तसेच त्यानंतर 2 मॅचची टेस्ट सिरीजदेखील खेळणार आहेत.

First published:

Tags: Pakistan, Pakistan Cricket Board, Test cricket, Test series