मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'मग बघू कोण IPL खेळतं ते', भारताला धमकी देत पाकिस्तान आयपीएलचीच कॉपी करणार!

'मग बघू कोण IPL खेळतं ते', भारताला धमकी देत पाकिस्तान आयपीएलचीच कॉपी करणार!

आयपीएलमधून (IPL) प्रेरणा घेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Pakistan Cricket Board) आता पाकिस्तान सुपर लीगमध्येही (PSL) बदल करणार आहे. पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

  • Published by:  Shreyas
कराची, 15 मार्च : आयपीएलमधून (IPL) प्रेरणा घेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Pakistan Cricket Board) आता पाकिस्तान सुपर लीगमध्येही (PSL) बदल करणार आहे. पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी याबाबत माहिती दिली आहे. पीएसएलमध्ये हे बदल केले तर जास्त कमाई होईल, असं रमीझ राजा यांना वाटत आहे. पीएसएलमध्ये सध्या असलेल्या ड्राफ्ट सिस्टीमपेक्षा लिलाव प्रक्रिया लागू करण्याची गरज असल्याचं रमीझ राजा पत्रकारांशी बोलताना म्हणाले. पाकिस्तान सुपर लीगमध्ये सुरूवातीपासून ड्राफ्ट सिस्टीम वापरली जात आहे. क्रिकइन्फोशी बोलताना रमीझ राजा म्हणाले, 'पीएसएल महसूल प्राप्त करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावू शकतो, ज्यामुळे देशाची प्रतिष्ठा वाढेल. जर सगळं काही ठीक झालं तर पीएसएल आयपीएलची मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून समोर येईल. बदलानंतर बरेच क्रिकेटपटू आयपीएलपेक्षा पीएसएलमध्ये खेळणं पसंत करतील,' असा विश्वासही राजा यांनी व्यक्त केला. आम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी नवीन संपत्ती तयार करण्याची गरज आहे. आमच्याकडे पीएसएल आणि आयसीसीकडून येणाऱ्या फंडाशिवाय दुसरं काहीही नाही. या मॉडेलबद्दल चर्चा सुरू आहे, पुढच्या वर्षी लिलावाचं मॉडेल राबवण्याची माझी इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया रमीझ राजा यांनी दिली. 'मार्केट आमच्यासाठी अनुकूल आहे, पण याबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही फ्रॅन्चायजींच्या मालकांसोबत बैठक घेऊ. हा पैशांचा खेळ आहे. पाकिस्तान क्रिकेटची अर्थव्यवस्था वाढली तर आमचा सन्मान वाढेल. आम्ही पीएसएलमध्ये लिलावाचं मॉडेल आणलं आणि पर्स वाढवली तर स्पर्धा आयपीएलशी असेल. मग बघू पीएसएलपेक्षा जास्त महत्त्व आयपीएलला कोण देतं ते,' असं वक्तव्य रमीझ राजा यांनी केलं.
First published:

Tags: BCCI, Cricket, Ipl, Pakistan Cricket Board

पुढील बातम्या