मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

पैशांसाठी काय पण! पाकिस्तान क्रिकेट बोर्ड स्टेडियममध्ये करणार असे बदल

पैशांसाठी काय पण! पाकिस्तान क्रिकेट बोर्ड स्टेडियममध्ये करणार असे बदल

पाकिस्तान सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Pakistan vs Australia) घरच्या मैदानात टेस्ट सीरिज खेळत आहे. तीन टेस्ट मॅचच्या या सीरिजनंतर वनडे सीरिजही होणार आहे, पण त्याआधी चाहत्यांना हैराण करणारी बातमी समोर आली आहे.

  • Published by:  Shreyas
लाहोर, 16 मार्च : पाकिस्तान सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Pakistan vs Australia) घरच्या मैदानात टेस्ट सीरिज खेळत आहे. तीन टेस्ट मॅचच्या या सीरिजनंतर वनडे सीरिजही होणार आहे, पण त्याआधी चाहत्यांना हैराण करणारी बातमी समोर आली आहे. पाकिस्तान लाहोरमधील ऐतिहासिक गडाफी स्टेडियमचं (Gadaffi Stadium Lahore) नाव बदलणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी याबाबतची घोषणा केली आहे. स्पॉनसरशीपमुळे या मैदानाचं नाव बदलणार असल्याचं रमीझ राजा यांनी सांगितलं, पण यामागे राजकीय भूमिका असल्याबाबचे प्रश्न उपस्थित करण्यात आले. स्टेडियमचं नाव बदलण्यामागे कोणताही राजकीय अजेंडा नसल्याचं रमीझ राजा म्हणाले. पाकिस्तानचं हे ऐतिहासिक स्टेडियम 1959 साली उभारण्यात आलं, तेव्हा या स्टेडियमचं नाव लाहोर स्टेडियम होतं. यानंतर 1974 साली या मैदानात लीबियाचे राष्ट्राध्यक्ष मुअम्मर अल गडाफी यांनी भाषण दिलं, तेव्हा मैदानाचं नाव त्यांच्या नावावरून ठेवण्यात आलं, तेव्हापासूनच या मैदानाला गडाफी स्टेडियम म्हणून जगभरात ओळख मिळाली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डासोबत अनेक कंपनी संपर्कात आहेत, लवकरच गोष्टी अंतिम टप्प्यात येतील आणि नंतर स्टेडियमचं नाव ठरवलं जाईल. फक्त लाहोरच नाही तर कराची नॅशनल स्टेडियमबाबतही हा प्रस्ताव देण्यात आला आहे.
First published:

Tags: Pakistan Cricket Board

पुढील बातम्या