Home /News /sport /

पाकिस्तानच्या छोट्या खेळाडूंचा 'खोटा' खेळ, दोन स्पर्धा रद्द करण्याची नामुष्की

पाकिस्तानच्या छोट्या खेळाडूंचा 'खोटा' खेळ, दोन स्पर्धा रद्द करण्याची नामुष्की

पाकिस्तान क्रिकेट (Pakistan Cricket) हळू हळू पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहे. बाबर आझम (Babar Azam), मोहम्मद रिझवान, शाहीन शाह आफ्रिदी यांच्यासारख्या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे पाकिस्तान क्रिकेटची प्रतिमा सुधारू लागली आहे.

    मुंबई, 19 जानेवारी : पाकिस्तान क्रिकेट (Pakistan Cricket) हळू हळू पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहे. बाबर आझम (Babar Azam), मोहम्मद रिझवान, शाहीन शाह आफ्रिदी यांच्यासारख्या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे पाकिस्तान क्रिकेटची प्रतिमा सुधारू लागली आहे. एवढच नाही तर अनेक टीमनी पाकिस्तानचा दौराही सुरू केला आहे. एकीकडे पाकिस्तान क्रिकेटची गाडी पुन्हा एकदा रुळावर येत असतानाच ज्युनियर क्रिकेटमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर मोठी नामुष्की ओढावली आहे. पाकिस्तान पुन्हा एकदा त्यांच्या खेळाडूंमुळे चुकीच्या कारणांनी चर्चेत आलं आहे. ज्युनियर क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्यामुळे पाकिस्तान क्रिकेटला दोन स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या चुकीच्या वयामुळे अंडर-13 आणि अंडर-16 स्पर्धा निलंबित केली आहे. आता खेळाडूंचं योग्य वय जाणून घेण्यासाठी बोर्ड बोन टेस्ट करणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या काही खेळाडूंचं वय जास्त होतं हे लक्षात आलं, त्यानंतर स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. बोर्ड या खेळाडूंना यंत्रणेमध्ये असलेल्या त्रुटींचा फायदा उचलू देणार नाही. तसंच संधी न मिळालेल्या टॅलेंटेड खेळाडूंचंही नुकसान होऊ देणार नाही. या क्रिकेटपटूंच्या भविष्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितलं. वयाचा खोटा दाखला देणं गुन्हा आहे, तसंच हे यंत्रणेला बर्बाद करणारं संकटही आहे. कौशल्य असलेले युवा खेळाडू संधी मिळत नसल्यामुळे पलायन करत आहेत, त्यामुळे यंत्रणेतल्या त्रुटी दूर करणं गरजेचं आहे, असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Pakistan Cricket Board

    पुढील बातम्या