कंगाल पाकिस्तान बोर्डाला आयपीएलची कॉपी पडली महागात, बसला 24 कोटींचा फटका!

कंगाल पाकिस्तान बोर्डाला आयपीएलची कॉपी पडली महागात, बसला 24 कोटींचा फटका!

आर्थिक परिस्थिती डबघाईला आली असताना पाकिस्तान देशानं आयपीएलच्या धर्तीवर पाकिस्तान क्रिकेट लीगची सुरुवात केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 सप्टेंबर : आयपीएल ही स्पर्धा भारतात एवढी लोकप्रिय आहे की, आधीचे हंगाम संपण्याआधीच पुढच्या हंगामाच्या तयारीला सुरुवात होते. बीसीसीआयच्या या स्पर्धेने भारतीय संघाला अनेक खेळाडू दिले, एवढेच नाही तर प्रत्येक वर्षी आर्थिक उलाढालीमध्ये वेगवेगळे विक्रम प्रस्थापित केले. त्यामुळं जागतिक स्थरातील सर्वात श्रीमंत लीग म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते.

इंडियन प्रीमिअर लीगला मिळालेले यश अर्थातच भारताच्या लाडक्या शेजाऱ्यांना पाहावे गेले नाही. म्हणून आर्थिक परिस्थिती डबघाईला आली असताना पाकिस्तान देशानं आयपीएलच्या धर्तीवर पाकिस्तान क्रिकेट लीगची सुरुवात केली. पण प्रेक्षक सोडा, पण या स्पर्धेला साधा एक टक्क्याचा नफाही कमवता आला नाही. त्यामुळं सारा देश आर्थिक अडचणीत असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कोट्यावधींचा फटका बसला आहे.

यातही पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं पीसीएलचे दोन हंगाम आयोजित केले. नुकत्याच पीएसएलच्या पहिल्या दोन हंगामांचा लेखपरिक्षण अहवाला जारी करण्यात आला मात्र या दोन हंगामांमधील आर्थिक व्यवहारांमधली अनियमीतता, खेळाडूंना पैसे न देणे, संघमालकांकडून पैसे गोळा करण्यासाठी झालेला उशीर, कोट्यवधी रुपयांची थकवलेली बिलं, पत्रकार-स्थानिक क्रिकेट बोर्डाचे सदस्य यांना देण्यात आलेले भत्ते या सगळ्याचा फटका पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बसला आहे. हा तोटा थोडा थोडका नसून तो तबब्ल 24 कोटी 86 लाख रुपयांचा झाला आहे.

वाचा-आज तुटणार सर्वात मोठा रेकॉर्ड, 4 वर्षांनंतर भारताला सूड घेण्याची संधी!

एवढेच नाही तर या अहवालानुसार या स्पर्धेसाठी देण्यात आलेले 14 कोटी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं अवैध रित्या पाकिस्तानबाहेर पाठवले. Auditor General of Pakistanने पाकिस्तानच्या संसदेत हा अहवाल सादर केला. त्यानुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि संघमालक यांच्यांमध्ये समन्वय नसल्यामुळं तोट्याची आकडेवारी सादर केली आहे.

पाकिस्तानातील महागाई आकाशाला

कंगाल पाकिस्तानची अवस्था दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे. आंतरराष्ट्रीय दबाव, चहूबाजूंनी पाकिस्तानची कोंडी झाल्यानं पाकिस्तानला चांगलाच फटका बसला आहे. पाकिस्तानात दिवसेंदिवस महागाईचे उच्चांक गाठले आहेत. वाढत्या महागाईचे चटके मात्र पाकिस्तानातील जनतेच्या खिशाला बसत आहेत.

वाचा-युरोपचे भारताला समर्थन; पाकिस्तानला विचारले, 'दहशतवादी चंद्रावरून येतात का?'

बँकाही बेजार

मार्च 2019 मध्ये पाकिस्तानमधील महागाईचा दर 9.41 टक्के होता. वारंवार वाढणाऱ्या महागाईमुळे पाकिस्तानमधील बँकांनी व्याजदरही 10.75 टक्के केला आहे. तर काही कंपन्यांनी त्यांचं बस्तान हलवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानवर आर्थिक संकट आलं आहे.पाकिस्तान दहशतवादाल थारा देत असल्यानं भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांनी पाकिस्तानची निर्यात बंद केली होती.

वाचा-पाकच्या बॅट कमांडोंचा घुसखोरीचा कट भारतीय लष्कराने उधळला, पाहा VIDEO

अपघातात फोटो काढणाऱ्या तरुणाला बोनटवर घेऊन पळाला आरोपी, पाहा VIRAL VIDEO

Published by: Priyanka Gawde
First published: September 18, 2019, 5:37 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading