इंग्लंडकडून लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघात मोठे बदल

विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 16 जूनला हाय-वोल्टेज सामना होणार आहे. यासाठी पाकिस्ताननं 15 शिलेदारांची घोषणा केली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 20, 2019 02:42 PM IST

इंग्लंडकडून लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघात मोठे बदल

लाहोर, 20 मे : विश्वचषकाला केवळ 10 दिवस उरले आहेत. याच दरम्यान, असताना इंग्लड विरोधात झालेल्या एकदिवसीय मालिकेत लाजीरवाणा पराभव स्विकारल्यानंतर पाकिस्तानंन एक मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या संघाने वर्ल्ड कप चमूत दोन महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान संघाच्या निवड समितीचे प्रमुख इंजमाम उल हक यांनी सोमवारी पुन्हा एकदा पाकिस्तानचा 15 जणांचा अंतिम संघ जाहीर केला आहे.

पाकिस्ताननं जाहीर केलेल्या संघात याआधी संघात सामिल केलेल्या जुनैद खान व फहीम अशरफ यांना डच्चू देण्यात आला आहे. तर, मोहम्मद आमीर व वाहब रियाज यांचा समावेश करण्यात आला आहे.

याबाबत निवड समितीचे प्रमुख इंजमाम उल हक यांनी पत्रकारांशी बोलताना, ''इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आमच्या गोलंदाजांना अपयश आले. त्यामुळे आम्ही संघात मोठे बदल केले आहे. संघात आमीर व रियाज या अनुभवी शिलेदारांना संधी देण्यात आली आहे. त्यांना न घेऊन आम्ही फार मोठी चूक केली असती,''अशी कबुली इंजमाम उल हकने दिली.

मात्र, वाहब रियाजला संघात स्थान दिल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रियाजनं पाकिस्तानसाठी आतापर्यंत 79 एकदिवसीय सामन्यात 34.34 च्या सरासरीनं 102 विकेट घेतल्या आहेत. तर, दोन वर्षांपूर्वी त्यानं शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. भारता विरोधात तो 2017मध्ये शेवटचा सामना खेळला होता. दरम्यान त्याच्याकडे अनुभव असला तरी, त्याला संघात घेणे ही पाकिस्तानकरिता धोकादायक असणार आहे. तर, पाकिस्तान संघानं आसिफ अलीलाही संधी दिली आहे. त्यानं इंग्लंड विरोधात एकदिवसीय सामन्यात 142 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.


Loading...


पाकिस्तानचा संघ : फखर जमान, इमाम-उल-हक, आसीफ अली, मोहम्मह हाफीज, बाबर आझम, सर्फराज अहमद ( कर्णधार), हॅरिस सोहेल, शोएब मलिक, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहिद आफ्रिदी, मोहम्मद आमीर, वाहब रियाज, मोहम्मद हसनैन.

वाचा- बाप मैदानावर खेळत असताना मुलीने घेतला अखेरचा श्वास

वाचा- इंग्लंडचे दोन विश्विक्रम, पाकविरुद्ध 4-0 ने मालिका विजय


EXCLUSIVE: 'नवनीत राणा नही आँधी है, दुसरी इंदिरा गांधी है...' पाहा UNCUT मुलाखत


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2019 02:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...