पाक कर्णधार सरफराजनं स्वीकारलं धोनीचं शिष्यत्व, युझरनी घेतली मजा

पाक कर्णधार सरफराजनं स्वीकारलं धोनीचं शिष्यत्व, युझरनी घेतली मजा

कर्णधार सरफराज अहमदला धोनीची नक्कल करणे महागात पडले आहे.

  • Share this:

कराची, 02 ऑक्टोबर : पाकिस्तान क्रिकेट संघाला तब्बल 10 वर्षांनी मायदेशात क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. श्रीलंकेविरोधात होत असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना पावसामुळं रद्द झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्ताननं शानदार विजय मिळवला. मात्र कर्णधार सरफराज अहमदला धोनीची नक्कल करणे महागात पडले आहे.

पाकिस्तानचा संघ चार वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केला. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत दुसऱ्या सामन्यात पाकनं 67 धावांनी विजय मिळवला. एकदिवसीय मालिकेनंतर दोन्ही संघ तीन टी-20 सामने खेळणार आहे. या सामन्यात पाक संघाचा एक वेगळा अवतार पाहायला मिळाला. मात्र, कर्णधार सरफराज अहमद सोशल मीडियावर एक भलत्याच कारणानं ट्रोल होत आहे.

श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सरफराज अहमदनं धोनीची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं अहमद सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. पाकिस्ताननं दिलेल्या 306 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा अर्धा संघ 28 धावांवर बाद झाला. त्यामुळं संघ संकटात असताना शेहान जयसूर्या आणि दासुन शनाकाने यांनी रेकॉर्डब्रेक 177 धावांची भागिदारी केली. याच दरम्यान 34व्या ओव्हरमध्ये जयसूर्याच्या पायाला दुखापत झाली आणि तो जमीनीवर कोसळला. यावेळी सरफराजनं त्याला मदत केली. असाच काहीसा प्रकार 2015मध्ये धोनीनं केला होता. धोनीनं ड्युप्लेसिसला मदत केली होती. हा फोटो आयसीसीनं आपल्या ट्विटरवर टाकला आहे.

धोनीनं केली होती ड्युप्लेसिसला मदत

पाकिस्तानच्या सरफराजनं श्रीलंकेच्या कर्णधाराला केलेल्या मदतीनंतर धोनीनं 2015मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला केलेल्या मदतीचा फोटो व्हायरल झाला आहे. 2015मध्ये ड्युप्लेसिसला धोनीनं अशाच अंदाजात मदत केली होती.

महात्मा @ 150 : नाशिकमध्ये 30 फुटांचं धातू शिल्प उभं करून बापूंना अभिवादन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 2, 2019 02:33 PM IST

ताज्या बातम्या