World cup 2019 : सहा वेळा हरलेला पाकिस्तान म्हणतो...यंदा वर्ल्ड कपमध्ये भारताला हरवणारचं !

पाकिस्तानला वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध एकही विजय मिळवता आलेला नाही.

News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2019 07:22 PM IST

World cup 2019 : सहा वेळा हरलेला पाकिस्तान म्हणतो...यंदा वर्ल्ड कपमध्ये भारताला हरवणारचं !

कराची, 22 एप्रिल : भारत आणि पाकिस्तान या देशांच नाव घेतल्यावर समोर येते ती तणावपुर्ण परिस्थिती आणि क्रिकेट. या दोन्ही देशातील केवळ खेळाडूच मैदानावर खेळत नाहीत, तर चाहत्यांमध्येही एक युद्धजन्य परिस्थिती असते. यातच हे संघ वर्ल्ड कप सारख्या स्पर्धेत एकमेकांसमोर आले तर मग विचारायलाच नको...

इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या आगामी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना होणार आहे. दरम्यान या सामन्याआधीच पाकिस्तान संघाचा कर्णधार सर्फराज अहमदनं एक अजब निर्धार बोलून दाखवला. म्हणे, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पराभवाची चव चाखवू. यामुळं सोशल मीडियावर सध्या त्याला चांगलचं ट्रोल केलं जात आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 16 जूनला ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणार आहे. दोन्ही संघांनी वर्ल्ड कप स्पर्धेकरीता तुल्यबळ खेळाडूंची निवड केली आहे. याआधी पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळं तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यास त्यांना मदत मिळेल. तत्पूर्वी आज झालेल्या पत्रकार परिषदेत अहमदनं भारतीय संघाला नमवण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच, ,''संघातील प्रत्येक खेळाडूला भारताविरुद्ध विजय मिळवायचा आहे. पण, वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रत्येक सामना आम्ही भारताविरुद्धच खेळतोयं अस समजून मैदानात उतरणार आहोत.'', असंही बरळला.तसंच आम्ही भारताविरोधात नुकत्याच आयसीसीच्या स्पर्धेत नमवलं आहे. त्यामुळं त्याचा फायदा आम्हाला नक्कीच होणार आहे.भारातविरुद्ध पाकिस्तान संघाची कामगिरी नेहमीच निराशाजनक राहिली आहे. पाकिस्तानला वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळं अहमदच्या या वक्तव्यानं त्याचं हसु झालं आहे.


SPECIAL REPORT : राज ठाकरेंना जशास तसे उत्तर, लावा रे तो व्हिडिओ!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 07:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...