शोएब मलीकनंतर पाकिस्तानचा ‘हा’ क्रिकेटपटू आज होणार भारताचा जावई!

शोएब अलीनंतर आज आणखी एक पाक खेळाडू भारताचा जावई होणार आहे.

  • Share this:

पाकचा जलद गोलंदाज हसन अलीसोबत आज भारताची शामिया लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळं शोएब अलीनंतर आज आणखी एक पाक खेळाडू भारताचा जावई होणार आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात जन्माला आलेला हसन अली आणि हरियाणाची निवासी शामिया यांचा विवाह दुबईच्या एटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटेलमध्ये होणार आहे. (फोटो- द आर्टिस्ट वेडिंग फोटोग्राफी)

दरम्यान हसन अली आणि शामिया यांच्या मेहंदीचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हसन अलीनं आपल्या मित्रांसमवेत दुबईमध्ये सफारीही केली. त्याच्या प्री-वेडिंग शूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.(फोटो- द आर्टिस्ट वेडिंग फोटोग्राफी)

दरम्यान हसन अली आणि शामिया यांच्या मेहंदीचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हसन अलीनं आपल्या मित्रांसमवेत दुबईमध्ये सफारीही केली. त्याच्या प्री-वेडिंग शूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (फोटो- द आर्टिस्ट वेडिंग फोटोग्राफी)

मेहंदी कार्यक्रमानंतर हसन अलीनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. ज्यात त्यानं बॅचलर म्हणून शेवटची रात्र, असे कॅप्शन दिले होते.

शामिया आणि हसन अली यांच्या लग्नाबाबत अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. मात्र शामियाच्या वडीलांनी, "मुलीचे लग्न तर करायचे आहे. मग मुलगा भारताचा असो किंवा पाकिस्तानचा, याचा काही फरक पडत नाही. फाळणीनंतर आमचे नातेवाईक पाकिस्तानात गेले", असे सांगितले.

शामियाने मानव रचना युनिव्हर्सिटीतून एरॉनॉटिकल इंजिनियरिंग केलं आगे. ती पहिल्यांदा जेट एअरवेजमध्ये होती. गेल्या तीन वर्षांपासून ती एअर अमीरातमध्ये काम करत आहे.

हसन अलीनं 2013मध्ये स्थानिक क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यानंर 2016मध्ये पाकिस्तानकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2017च्या चॅम्पियन ट्रॉफी संघातही त्याला समावेश करण्यात आला होता. हसन अलीच्या नावावर 50 एकदिवसीय विकेट आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 09:40 AM IST

ताज्या बातम्या