मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Asia Cup 2022: रविवारी पुन्हा महामुकाबल्याची पर्वणी, हाँगकाँगला हरवून पाकिस्तान सुपर फोरमध्ये

Asia Cup 2022: रविवारी पुन्हा महामुकाबल्याची पर्वणी, हाँगकाँगला हरवून पाकिस्तान सुपर फोरमध्ये

पाकिस्तानची हाँगकाँगवर मात

पाकिस्तानची हाँगकाँगवर मात

Asia Cup 2022: शारजाहच्या मैदानात हाँगकाँगचा धुव्वा उडवून पाकिस्ताननं आशिया चषकाच्या सुपर फोर फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता रविवारी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान संघात महामुकाबला रंगणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

शारजाह, 2 सप्टेंबर: यंदाचा आशिया चषक क्रिकेट चाहत्यांसाठी खास ठरणार आहे. कारण या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी सलग दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. आशिया चषकातल्या साखळी फेरीतील अखेरचा सामना आज शारजाच्या मैदानात पार पडला. या सामन्यात पाकिस्ताननं हाँगकाँगचा 155 धावांनी  धुव्वा उडवून सुपर फोर फेरीत प्रवेश केला. स्पर्धेच्या सुपर फोर फेरीसाठी पात्र ठरणारा पाकिस्तान हा चौथा संघ ठरला.

हाँगकाँगचा धुव्वा

अखेरच्या साखळी लढतीत पाकिस्ताननं हाँगकाँगवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्ताननं मोहम्मद रिझवान (78 धावा) आणि फखर झमानच्या (53 धावा) अर्धशतकांच्या जोरावर 2 बाद 193 धावांचा डोंगर उभारला. पण या आव्हानाचा पाठलाग करताना हाँगकाँगचा डाव अवघ्या 38 धावात आटोपला. पाकिस्तानकडून शादाब खाननं 4, नवाझनं 3, नसीम शाहनं 2 तर दहानीनं एक विकेट घेतली.

पाकिस्तानचा सर्वात मोठा विजय

दरम्यान धावांच्या फरकानं पाकिस्ताननं मिळवलेला हा आजवरचा सर्वात मोठा विजय ठरला. तर टी20 क्रिकेटमधला हा दुसरा सर्वात मोठा विजय होता.

टी20 तले सर्वात मोठे विजय

172 श्रीलंका वि. केनिया, 2007

155 पाकिस्तान वि. हाँगकाँग, 2022

143 भारत वि. आयर्लंड, 2018

143 पाकिस्तान वि. वेस्ट इंडिज. 2018

4 सप्टेंबरला महामुकाबला

आशिया चषकाच्या अ गटात दोन्ही सामने जिंकून टीम इंडियानं अव्वल स्थान पटकावलं. त्यामुळे 4 सप्टेंबरला भारतीय संघ सुपर फोर फेरीत आपला पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यात भारताचा सामना पुन्हा पाकिस्तानसोबत होणार आहे. यंदाच्या स्पर्धेत पाकिस्तान आणि टीम इंडिया पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत.

First published:

Tags: Asia cup, Pakistan, T20 cricket