पाकिस्तानचा पुन्हा रडीचा डाव, IPLच्या सामन्यांना पाकिस्तानात बंदी

पाकिस्तानचा पुन्हा रडीचा डाव, IPLच्या सामन्यांना पाकिस्तानात बंदी

या निर्णयाबद्दल मात्र ट्विटरवरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ट्रोल करण्यात येत आहे.

  • Share this:

मुंबई, 22 मार्च : पुलवामा हल्ल्यानंतर, भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्वंद्वाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.  या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान सुपर लीगचे प्रक्षेपण भारतात न करण्याचा निर्णय घेतला होता. आता याच पार्श्वभूमीवर पाकिस्ताननने आयपीएलच्या 12व्या हंगामातील सामने पाकिस्तानात प्रसारित न करण्याचा निर्णय घेतला आहे.


यासंदर्भातील माहिती पाकिस्तानचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद अदमद चौधरी यांनी दिली. गेल्या काही वर्षांमध्ये बीसीसीआय आणि पाक क्रिकेट बोर्ड यांच्यात सुरु असलेल्या वादात आयसीसी दरबारात सतत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा पराभव होत आहे. पाकिस्तानच्या माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांनी पलटवार करत 'भारताने आम्हाला दिलेल्या वागणुकीचा हा बदला आहे', असं सांगत पाकिस्तानमध्ये आयपीएलचे सामने दाखवले जाणार नाहीत, हा निर्णय घेतला. यावेळी चौधरी यांनी, ‘’आम्ही क्रिकेट आणि राजकारण या दोन गोष्टी वेगळ्या ठेवण्याचा सतत प्रयत्न केला. मात्र भारताने ‘आर्मी कॅप’ घालून सामना खेळला, ज्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.” असा रडीचा डाव खेळला. दरम्यान, आयपीएलच्या बाराव्या हंगामाला उद्यापासून सुरुवात होते आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज संघ विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाशी खेळणार आहे.या निर्णयाबद्दल ट्विटरवरुन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ट्रोल करण्यात येत आहे. एका भारतीय क्रिकेट चाहत्याने, पाकिस्तानने सामने दाखवले नाही तर, त्यात आमचे काही बिघडत नाही.तर, पाकिस्तानमधीलच क्रिकेट चाहत्यांनी पंतप्रधान इमरान खान यांना या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी विनंती केली आहे. तर काही चाहत्यांनी पीसीबीच्या या निर्णयाचे स्वागत करत, भारताला जश्यास तसे उत्तर दिल्याबद्दल सरकारचे कौतुक केले आहे.
VIDEO : मुलं मुलींकडे बघणार नाहीतर काय मुलांकडे बघणार? उदयनराजेंचं विद्यार्थिनीच्या प्रश्नावर उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2019 07:32 PM IST

ताज्या बातम्या