• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • BAN vs PAK : शोएब अख्तरच्या फास्ट बॉलचा विक्रम तुटला, पाकिस्तानी बॉलरने टाकला 219 KPH वेगाने बॉल!

BAN vs PAK : शोएब अख्तरच्या फास्ट बॉलचा विक्रम तुटला, पाकिस्तानी बॉलरने टाकला 219 KPH वेगाने बॉल!

टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये (T20 World Cup Semi Final) ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडचा कॅच सोडल्यानंतर व्हिलन झालेल्या हसन अलीने (Hasan Ali) जोरदार पुनरागमन केलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 19 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये (T20 World Cup Semi Final) ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडचा कॅच सोडल्यानंतर व्हिलन झालेल्या हसन अलीने (Hasan Ali) जोरदार पुनरागमन केलं आहे. बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh vs Pakistan) पहिल्या टी-20 मध्ये हसन अलीने 22 रन देऊन 3 विकेट घेतल्या. या सामन्यात हसन अलीने पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरचा (Shoaib Akhtar) विक्रम मोडल्याचंही बोललं जातंय. अख्तरने 2003 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध 161.3 किमी प्रती तास या वेगाने बॉल टाकला होता. हसन अलीने या सामन्यात बांगलादेशच्या नजमुल हुसैन शन्टोला 219 किमी प्रती तास वेगाने बॉल टाकला. हसन अलीने या वेगाने टाकलेला बॉल टाकून अनेक जण हैराण झाले, पण नंतर वेग मोजणाऱ्या मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे असं झाल्याचं नंतर स्पष्ट झालं. यानंतर हसन अलीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये पाकिस्तानचा विजय झाला, याचा शिल्पकार हसन अली ठरला. हसन अलीने 4 ओव्हरमध्ये 22 रन देऊन 3 विकेट घेतल्या. या कामगिरीबद्दल त्याला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. शादाब खान आणि मोहम्मद नवाज यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. बांगलादेशकडून मेहदी हसनने 20 बॉलमध्ये नाबाद 30 रन केले. बांगलादेशच्या 128 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची अवस्था 27 रनवर 3 विकेट अशी झाली होती. 100 रनच्या आत पाकिस्तानचे 6 खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले होते. पण शादाब खानने नाबाद 21 रन आणि मोहम्मद नवाजने नाबाद 18 रनची खेळी केली आणि पाकिस्तानला 4 विकेटने विजय मिळवून दिला.
  Published by:Shreyas
  First published: