मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /पाकिस्तानच्या परावभवानंतर त्यांच्याच देशात फुटले फटाके; नागरिकांनी रस्त्यावर येऊन साजरा केला आनंद

पाकिस्तानच्या परावभवानंतर त्यांच्याच देशात फुटले फटाके; नागरिकांनी रस्त्यावर येऊन साजरा केला आनंद

ऑस्ट्रेलिया आणि भारतातल्या नागरिकांमध्ये तर पाकिस्तानच्या पराभवामुळे आनंद होताच; मात्र बलुचिस्तानातल्या नागरिकांनीही पाकिस्तान पराभूत झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात आनंद साजरा केला. पाहा VIDEO

ऑस्ट्रेलिया आणि भारतातल्या नागरिकांमध्ये तर पाकिस्तानच्या पराभवामुळे आनंद होताच; मात्र बलुचिस्तानातल्या नागरिकांनीही पाकिस्तान पराभूत झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात आनंद साजरा केला. पाहा VIDEO

ऑस्ट्रेलिया आणि भारतातल्या नागरिकांमध्ये तर पाकिस्तानच्या पराभवामुळे आनंद होताच; मात्र बलुचिस्तानातल्या नागरिकांनीही पाकिस्तान पराभूत झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात आनंद साजरा केला. पाहा VIDEO

    कराची, 12 नोव्हेंबर: यंदाच्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमधील (ICC T20 Semi final) दुसरा सेमी फायनल (T20 World cup) सामना 11 नोव्हेंबरला पार पडला. आतापर्यंत वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या पाकिस्तानला या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव (Australia beat Pakistan) स्वीकारावा लागला. यामुळे पाकिस्तानचं वर्ल्ड-कपमधलं (Pakistan’s journey in world cup) आव्हान संपुष्टात आलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मीम्सचा (Memes on Pakistan’s defeat) पाऊस पडला होता. ऑस्ट्रेलिया आणि भारतातल्या नागरिकांमध्ये तर पाकिस्तानच्या पराभवामुळे आनंद होताच; मात्र बलुचिस्तानातल्या नागरिकांनीही पाकिस्तान पराभूत झाल्यामुळे (Balochistan celebrated Pakistan’s defeat) मोठ्या प्रमाणात आनंद साजरा केला.

    पाकिस्तानी वंशाचे कॅनडियन पत्रकार तारिक फतेह (Tarek Fateh Balochistan video) यांनी ट्विटरवर बलुचिस्तानच्या नागरिकांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बलुचिस्तानचे नागरिक पाकिस्तान पराभूत झाल्यामुळे आनंद (Balochistan dancing over Pakistan’s defeat) साजरा करताना दिसून येत आहेत. यासोबतच बलुच नॅशनल मूव्हमेंटचे (यूके झोन) अध्यक्ष हकीम बलुच यांनीही ट्विटरवर असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यातही लोक आनंदाने रस्त्यावर नाचताना दिसून येत आहेत.

    पाकिस्तानचाच एक प्रांत असणारं बलुचिस्तान गेल्या कित्येक वर्षांपासून स्वातंत्र्याची मागणी करत आहे. पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्यासाठी तिथले स्थानिक नागरिक बलुच नॅशनल मूव्हमेंट (Baloch National Movement) या नावाने चळवळ चालवत आहेत.

    AUS vs PAK सामन्यात 'भारत माता की जय' ची घोषणा, VIDEO व्हायरल

    पाकिस्तानी सेना वारंवार ही चळवळ दडपण्यासाठी बलुच नागरिकांवर अत्याचार करत असते. कित्येक वेळा या अत्याचारांना कंटाळलेले नागरिक पाकिस्तानी सैनिकांवर हल्लाही करतात. काही दिवसांपूर्वी चिनी अभियंत्यांच्या एका बसमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटाचं कनेक्शनही बलुचिस्तानशी असल्याचं समोर आलं होतं.

    दरम्यान, या पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडू हसन अली याला मोठ्या प्रमाणात ट्रोल (Hassan Ali trolled) करण्यात येत आहे. हसनने सोडलेल्या कॅचनंतरच ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यूने तीन सिक्स मारून मॅच फिरवली. त्यामुळे सध्या तरी हसन पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिलन ठरला आहे. संघाचा कप्तान बाबर आझमने मात्र या पराभवासाठी सर्व टीम जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

    AUS vs PAK पराभवानंतर Babar Azam ने घेतला संघाचा क्लास, 'जर कोणी....

    तसंच, कोणीही कोणत्याही खेळाडूबाबत नकारात्मक काही बोलायचं नाही असा इशाराही त्याने सर्व खेळाडूंना दिला आहे.

    पाकिस्तानला पराभूत करून ऑस्ट्रेलियाने धडाक्यात फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. आता न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान या विश्वचषकाचा अंतिम सामना (T20 World cup Final) पार पडणार आहे.

    First published:
    top videos

      Tags: Pakistan, T20 cricket, T20 world cup