मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

LIVE मॅच दरम्यान पाकिस्तान खेळाडूची फाटली पँट अन्...VIDEO

LIVE मॅच दरम्यान पाकिस्तान खेळाडूची फाटली पँट अन्...VIDEO

Shan masood torn down trouse

Shan masood torn down trouse

ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर (Pakistan vs Australia)आहे. रावळपिंडी येथे पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना सुरु आहे. दरम्यान, या सामन्यात एक मजेशीर किस्सा पाहायला मिळाला. फिल्डींग करताना पाकिस्तानच्या खेळाडूची पँटच फाटली(Shan masood torn down trouse) आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 8 मार्च: ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर (Pakistan vs Australia))आहे. दोन्ही संघामध्ये 3 मॅच सिरीजमधील पहिली टेस्ट मॅच रावळपिंडी येथे खेळवण्यात येत आहे. पाकिस्तानचा ओपनर इमाम उल हक (Imam-ul-Haq)याने 157 तर अजहर अली (Azhar Ali ) याने 185 धावांची कमालीची खेळी खेळत पहिला डाव 476 वर घोषित केला. पाकिस्तानाचे 476 धावांचे आवाहन स्विकारत मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघानेही जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानी 449 धावा केल्या आहेत. दरम्यान, या सामन्यात एक मजेशीर किस्सा पाहायला मिळाला. फिल्डींग करताना पाकिस्तानच्या खेळाडूची पँटच फाटली(Shan masood torn down trouse) आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बदली खेळाडू म्हणून फिल्डींग करण्यासाठी आलेल्या खेळाडू शान मसूद याची पँट फाटलेली दिसली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवप खेळाडूचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवर नेटकऱ्यांच्या कमेंटचा पाऊस पडला आहे. काही नेटकऱ्यांनी थट्टा उडवली. तर काहींनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डावरही निशाणा साधला आहे. ही घटना ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या 123 व्या षटकात घडली. नौमान अली (Nauman Ali)हे षटक टाकत होता. नौमनच्या या षटकाच्या 5 व्या बॉलवर ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीने (Alex Carey) रिव्हर्स स्वीप खेळला. चेंडू पॉइंटच्या दिशेने गेला, त्याला पर्यायी क्षेत्ररक्षक शान मसूदने रोखण्याचा प्रयत्न केला. मसूद बॉल रोखण्याचा प्रयत्न करत सीमारेषेवर लावलेल्या बॅनरला घासत बाहेर गेला. जेव्हा तो उभा राहिला तेव्हा त्याने पाहिले की त्याची पॅन्ट डाव्या बाजूला फाटलेली होती. यानंतर सर्वत्र त्याची खिल्ली उडवण्यात आली. त्याचे फोटो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने चार गड्यांच्या मोबदल्यात 476 धावा चोपल्या. अजहर अलीने 185 आणि इमाम उल हकने 157 धावांची खेळी केली. या दोन्ही खेळाडूंनी दुसऱ्या विकेटसाठी 208 धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाकिस्तान संघाला जोरदार प्रत्युत्तर दिले. डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी पहिल्या विकेटसाठी 156 धावांची भागिदारी केली. ख्वाजाने 97 आणि वॉर्नरने 68 धावांचे योगदान दिले. मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ आणि कॅमरन ग्रीन यांनीही दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. लाबुशेनने 90, स्टीव स्मिथ 78 आणि ग्रीनने 48 धावांचे योगदान दिले आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Australia, Pakistan Cricket Board

    पुढील बातम्या