Home /News /sport /

...अन् भर मैदानात वॉर्नर- आफ्रिदी दोघांनी एकमेकांना दिली खुन्नस, VIDEO

...अन् भर मैदानात वॉर्नर- आफ्रिदी दोघांनी एकमेकांना दिली खुन्नस, VIDEO

David Warner, Shaheen

David Warner, Shaheen

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया(pakvsaus 3rd test) संघामध्ये गद्दाफी स्टेडियमवर टेस्ट सिरीजमधील तिसरी मॅच पार पडली. या मॅचच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी डेव्हिड वॉर्नर (David Warner)आणि शाहीन आफ्रिदी(Shaheen Afridi )यांच्यातील बाचाबाचीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 24 मार्च: पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया(pakvsaus 3rd test) संघामध्ये गद्दाफी स्टेडियमवर टेस्ट सिरीजमधील तिसरी मॅच पार पडली. या मॅचच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी डेव्हिड वॉर्नर (David Warner)आणि शाहीन आफ्रिदी(Shaheen Afridi )यांच्यातील बाचाबाचीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दोघेही एकमेकांना खुन्नस देताना दिसत आहेत. त्याच्या या वादाची चर्चा क्रिकेट जगतात चांगलीच रंगली आहे. नेमकं झालं तरी काय? तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाकडून दुसऱ्या डावात डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) ही सलामीवीरांची जोडी फलंदाजी करत होती. यावेळी दिवसाचे अखेरचे षटक पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) टाकत होता. त्याने या षटकाचा आणि तिसऱ्या दिवसाचा अखेरचा चेंडू टाकला, ज्यावर वॉर्नरने बचावात्मक शॉट खेळला. पण, त्यानंतर गोलंदाज शाहीन आफ्रिदी पळत वॉर्नरच्या जवळ गेला. यावेळी वॉर्नरही त्याच्या अगदी जवळ जात त्याला भिडला. त्यानंतर दोन्ही खेळाडू मजेने एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून एकमेकांना खुन्नस देताना दिसले. यानंतर दोघेही हसून बाजूला गेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. IPL 2022 : मुंबई इंडियन्सला होम ग्राऊंडचा फायदा नाही, रोहित शर्माचा दावा! पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) तिसऱ्या कसोटीत (3rd Test) तिसऱ्या दिवसाखेरपर्यंत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व दिसून आले. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात पहिल्या डावात 10 बाद 391धावा धावा केल्या.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Australia, David warner, Pakistan, Test cricket

    पुढील बातम्या