गिलख्रिस्टला मागे टाकलंय, धोनी तर 'या' विक्रमाच्या आसपासही नाही

क्रिकेटमध्ये दररोज नवनवे विक्रम होत असतात. आता एका यष्टीरक्षक फलंदाजाने असाच विक्रम केला असून धोनी मात्र यामध्ये जवळपासही नाही.

News18 Lokmat | Updated On: Sep 23, 2019 11:55 AM IST

गिलख्रिस्टला मागे टाकलंय, धोनी तर 'या' विक्रमाच्या आसपासही नाही

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : भारताचा दिग्गज यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने यष्टीरक्षणात अनेक विक्रम केले आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्टही विक्रमांच्या यादीत वरच्या क्रमांकावर आहे. मात्र, पाकचा यष्टीरक्षक कामरान अकमलने अशी कामगिरी केली आहे की, या दोन्ही दिग्गजांना मागे टाकलं आहे. अकमलने पाकिस्तानमधील घरेलू क्रिकेटमध्ये खेळताना त्याच्या कारकिर्दीत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 31 वे शतक झळकावले आहे. प्रथम श्रेणीमध्ये सर्वाधिक शतकं करणारा आशियातील पहिला आणि जगातील दुसरा यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे.

अकमलने सेंट्रल पंजाबकडून खेळताना नॉर्थनविरुद्ध 170 चेंडूत 157 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत चार षटकार आणि 12 चौकार मारले. धोनी आणि कुमार संगक्कारा यांच्या शतकांपेक्षाही अकमलची शतके जास्त होतात. क्रिकेटच्या इतिहासात लेस एमेसनंतर अकमलची प्रथम श्रेणीत सर्वाधिक शतकं आहेत. लेसनं केंटकडून खेळताना 56 शतकं केली होती.

वाचा : टीम इंडियात चाललंय काय? चौथ्या क्रमांकासाठी पंत-अय्यर यांच्यात गोंधळ

भारताचा दिग्गज यष्टीरक्षक धोनी आता मैदानात उतरला तरी त्याच्या नावावर काहीतरी विक्रम नोंदवला जातोच. पण अकमलच्या या विक्रमाजवळ धोनी नाही. संगकाराच्या नावावर प्रथम श्रेणीत 64 शतकं आहेत. यातील जास्त शतकं ही एक फलंदाज म्हणून आहेत. तर धोनीच्या नावावर प्रथम श्रेणीत नऊ शतकं आहेत. लंकेचा कौशल सिल्वा अकमलच्या जवळ आहे. सिल्वानं 26 शतक केली आहेत.

वाचा : कौन बनेगा ...? पंतसह चार पर्याय, BCCIने शेअर केला VIDEO

Loading...

प्रथम श्रेणीमध्ये सर्वाधिक शतकं करणारा यष्टीरक्षक म्हणून लेस आणि अकमल यांच्यानंतर गिलख्रिस्टचं नाव घेतलं जातं. गिलख्रिस्टने त्याच्या कारकिर्दीत प्रथम श्रेणीमध्ये 29 शतकं केली होती. अकमलच्या दमदार खेळीच्या जोरावर पंजाबने पाच बाद 369 धावा केल्या.

वाचा : विराटची एक चूक अन् टीम इंडियाचा फ्लॉप शो, भारतानं गमावली मालिका

VIDEO: आता पाकिस्तानची खैर नाही; भारत-अमेरिकेची दहशतवादाविरुद्ध निर्णायक लढाई!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 11:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...