Elec-widget

पाक क्रिकेटपटूनं शेअर केला फोटो, ट्रोलर्स म्हणाले गटारीत पडलास काय?

पाक क्रिकेटपटूनं शेअर केला फोटो, ट्रोलर्स म्हणाले गटारीत पडलास काय?

लंकेविरुद्धच्या मालिकेसाठी निवड न झालेल्या पाकचा क्रिकेटपटू विंडीजमध्ये आहे. त्याने विराटची कॉपी करताना याआधी एक फोटो शेअऱ केला होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : पाकिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद हाफीजसाठी 2019 हे वर्ष फारसं चांगल ठरलं नाही. त्याला पहिल्यांदा सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून वगळण्यात आलं. तर लंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याला संधी मिळाली नाही. सध्या तो कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. त्याशिवाय विंडीजमध्ये आनंदही लुटत आहे. काही दिवसांपूर्वी एका शर्टलेस फोटोमुळे हाफीज ट्रोल झाला होता. आताही त्यानं एक असा फोटो टाकला आहे की त्यामुळे तु गटारीत पडलास काय? असा प्रश्न विचारला जात आहे.

मोहम्मद हाफीजनं सेंट लूसियामधून एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये शरीरावर काळ्या रंगात लेप लावलेला दिसत आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर त्याला ट्रोल केलं जात आहे. काही चाहत्यांनी तर विंडीजला जाऊन तुसुद्धा काळा झालास असं म्हटलं आहे. एका युजरनं लिहलं की, गटारीत पडला होतास काय?

पाकच्या क्रिकेटपटूने शेअर केलेला फोटो सेंट लूसियातील सल्फर स्प्रिंग पार्कमधील आहे. ही एक अशी जागा आहे जिथं लोक गरम सल्फर पूलमध्ये अंघोळ करू शकतात. यामध्ये बॉडीला नॅचरल मिनरल्स मिळतात. इथं पावसाचं पाणीही पर्वतांच्या उष्णतेमुळं गरम होतं. काही जागी तर पाणी इतकं गरम होतं की वाफ यायला लागते. हे सर्व ज्वालामुखीमुळं होतं. जगातील अनेक लोक या ठिकाणी भेट देत असतात.

याआधी मोहम्मद हाफीज शर्टलेस फोटो शेअर केल्यानं ट्रोल झाला होता. यात त्यानं कॅप्शन देताना म्हटलं होतं की, सुंदर सुर्यास्त. हाफीजनं विराटची कॉपी करण्याचा प्रयत्न केल्यानं युजर्सच्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

Loading...

VIDEO : शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे एकनाथ खडसेंनी व्यक्त केलं आश्चर्य, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2019 10:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...